आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सवाचा तिसरा दिवस:नशेपासून वाचण्याची शिकवण देतात एकदंत, आंतरिक आनंद देऊन मनात होतात विराजमान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गणेशाचा दुसरा अवतार एकदंतची कथा, जी सर्व नशेपासून दूर करते

पंडित विजयशंकर मेहता
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास सुरुवात केली तेव्हा स्वातंत्र्यसंग्रामाला आध्यात्मिक अभियानाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अजही राष्ट्रीय अभियानांतर्गत स्वत:ला सुरक्षित व स्वस्थ ठेवायचे आहे. एकदंत अवतारातून जीवन कसे वाचवावे व आत्मनिर्भर होऊन जीवनाला गती कशी द्यावी हेच गणेशाने सांगितले आहे. या अवतारात गणेशाने स्वत:ला स्वानंदवासी म्हटले होते. म्हणजे जीवनात कुठलेही काम करताना आनंद घेऊन ते करावे.

कथा : मदासुर पाताळात राहतो, जेथे एकदंत आहे तेथे तो येत नाही
महर्षी च्यवन यांनी मदासुराला जन्म दिला. त्यांनी दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून शक्तिमंत्र घेतला व देवी भगवतीला प्रसन्न करून घेतले. त्याला ब्रह्मांडाचे राज्य मिळाले. परंतु, त्याच्या राज्यात धर्म-कर्म समाप्त झाले. तेव्हा देवता व मुनींच्या आग्रहाखातर एकदंत प्रकट झाले. त्यांचे मदासुराशी युद्ध झाले. मृत्यू समोर दिसल्याने मदासुराने एकदंताची क्षमा मागितली. तेव्हा एकदंत म्हणाले, जेथे माझी पूजा-आराधना सुरू असेल तेथे तू येता कामा नये. जे लोक चुकीचे आचरण करतील त्यांची कर्मे तू भोगायची. त्यानंतर मदासुर थेट पाताळात गेला.

संकल्प : प्रार्थनेची साथ सोडू नका
एकदंत अवतार हा मायेचा धारक आहे. तो आम्हाला संकल्प करण्यासाठी प्रेरित करतो. सामर्थ्य व योग्यतेची नशा करू नका, जे मिळेल ते परमेश्वराची कृपा समजून स्वीकारा, असा संकल्प करा. सफलतेची नशा त्यागण्यासाठी संयमाचा उपयोग करा. आपल्याकडे जे आहे त्याचा निश्चित हिस्सा हा दुसऱ्यांसाठी ठेवू व त्यांना तो देऊ. अन्यथा ही नशा जीवनाच्या गतीला अडथळे आणेल.

संदेश : इतर कुणी ना आनंद देऊ शकतो ना दु:ख
श्री गणेश म्हणतात, या अवतारात मी स्वानंदवासी आहे. मनुष्य प्रसन्नतेसाठी इतरांवर अवलंबून नाही. इतर कुणी ना त्याला सुखी करू शकतो ना दु:खी. पण मदामुळे तो हे सगळे विसरून जातो. माया म्हणजे भ्रम, यात तो सर्व काल्पनिक गोष्टींमध्ये रममाण होतो. हा अवतार म्हणतो, मायेपासून मुक्त राहा. सत्याचा सामना करा. मदामुळे भ्रमाची निर्मिती होते आणि भ्रमित व्यक्ती कधीही उचित निर्णय घेऊ शकत नाही.

शिकवण : रूप, बल, धन, नशा होते
मद म्हणजे नशा, व्यसन. रूप, बल, धन आणि वयाची नशा मनुष्याला होते तेव्हा त्याला मदाच्या पत्नीचे नाव सालसा म्हणजे आळसयुक्त असते हे माहितीही होत नाही. त्याची मुले विलासी, लोलुप व धनप्रिय आहेत. नावातूनच हे सर्व एका वेळी येतात तेव्हा किती घातक ठरतील हे स्पष्ट होते. एकदंत गळ्यात चिंतामणी रत्नही घालतात, जे मायाला चटकन ओळखते.