आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंडित विजयशंकर मेहता
जेव्हा आपण गणेशाची प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्यामागील भावना, अर्थ समजून घेतला पाहिजे. प्रतिष्ठापनेचा अर्थ चालणेही होतो आणि प्रतिष्ठा देणे असाही होतो. या वेळी गणेशोत्सवाचे स्वरूप भलेही छोटेखानी आणि सुरक्षित असो, पण जीवनाची गती थांबू नये. गणेशोत्सव जल्लोष आणि आनंदाचे धार्मिक स्वरूप आहे. त्यात अनेक अर्थ समाविष्ट आहेत. गणेशाचे पहिले अवतार वक्रतुंडाची कहाणी आणि त्यातील संदेश जाणून घ्या.
कथा : ईर्षा कधी मरत नाही, पण तिच्यावर नियंत्रण ठेवता येते
इंद्राच्या मत्सरामुळे मत्सरासुर (ईर्षा) नावाचा राक्षस जन्मला. मत्सरासुराने गुरू शुक्राचार्यांकडून ‘ऊँ नम: शिवाय' मंत्राची दीक्षा मिळवली. शंकराकडून वरदान मिळाले की, तु अपराजित राहशील. मग मत्सरासुरानेे घोर अत्याचार सुरू केले. त्यामुळे देवता, ऋषी, मनुष्य दु:खी झाला. तेव्हा भगवान दत्तात्रेयाच्या सांगण्यावरून देवतांनी गणेशाची वक्रतुंडाच्या रूपात प्रकट होण्याची आराधना केली. पाच दिवस गणेशजी - मत्सरासुराचे युद्ध झाले. मृत्यू समोर दिसू लागल्यावर मत्सरासुर गणरायाला शरण गेला. वक्रतुंडाने त्याला मारले नाही, अभय दिले.
म्हणजे मत्सर (ईर्षा) कायम जिवंत आहे.
शिकवण : ईर्षा कधी एकटी येत नाही
दुसऱ्याला जे मिळते तेच प्राप्त करण्यासाठी ईर्षा माणसावर दडपण आणते आणि माणूस सातत्याने या चक्रात फसत जातो. ईर्षा विषय-भोग-विलासाची कामना उत्पन्न करत राहते. आपल्या जीवनात ईर्षा कधीच एकटी येत नाही. ती सोबत परिवाराला घेऊन येते. गणेशजींनी वक्रतुुंड अवतारात आपल्याला या ईर्षेला समजून घेण्याची आणि तिच्या नियंत्रणासाठी विवेकाचा वापर करण्याची शिकवण दिली आहे.
संदेश : प्रदीर्घ काळ राहणारी ईर्षा जळफळाट निर्माण करते
ईर्षा स्वत:पुरतेच पाहण्याची इच्छा निर्माण करते. हा दुर्गुण कुटुंबातील इतर सदस्यांमध्येही येतो. प्रदीर्घ काळ राहणारी ईर्षा जळफळाट निर्माण करते. असे लोक हीनभावनेने ग्रासून जातात. ज्या भगवान शंकराच्या वरदानाने मत्सरासुराला वरदान मिळाले त्याच शंकराच्या कैलासावर मत्सरासुराने कब्जा केला. ईर्षाग्रस्त मनुष्य स्वत: दु:खी राहतो आणि इतरांनाही त्रस्त करतो. गणेशजी सांगतात- जर वक्रतुंडाच्या रूपात मी जीवनात आहे तर तुम्हाला ईर्षामुक्त होणे गरजेचे आहे.
संकल्प : परोपकार आणि प्रार्थनेची सवय सोडणार नाही
या वेळी गणेशोत्सवात वक्रतुंड अवताराचे दर्शन करून आम्हाला हा संकल्प करायचा आहे की, आम्ही ईर्षामुक्त होणार. याचा एक मार्ग परोपकाराची भावना आहे. आमच्यात परहिताची भावना जितकी प्रबळ असेल तितकी ईर्षेतून मुक्ती मिळेल. हा संकल्पही करा की, इतरांचे अधिकाधिक चांगले करणार. कोणी प्रगती करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू. आपल्याला काय मिळते हे गणरायावर सोडू. जगाला चांगले काही देण्यासाठी विवेकबुद्धी जागृत ठेवू.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.