आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी घरी येणार श्रीगणेश:1893 मध्ये जेव्हा पहिल्यांदा टिळकांनी सुरु केला गणेशोत्सव, ठीक तसाच 126 वर्षांनंतर 22 ऑगस्टला जुळून येत आहे दुर्लभ योग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतासाठी शुभ राहतील गणेशोत्सवाचे हे योग

शनिवार 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. यावर्षी गणेश चतुर्थीला सूर्य सिंह राशीत आणि मंगळ मेष राशीमध्ये राहील. गणेश उत्सवाच्या सुरुवातीला सूर्य-मंगळाचा हा योग 126 वर्षांपूर्वी जुळून आला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 1893 मध्ये पहिल्यांदा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दहा दिवसीय गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची सुरुवात केली होती.

त्यावेळीही सूर्य आपल्या सिंह राशीमध्ये आणि मंगळ स्वतःच्या मेष राशीमध्ये स्थित होता. यावेळी 126 वर्षांनंतर असाच योग जुळून येत आहे. यावर्षीही सूर्य आणि मंगळ आपापल्या स्वामित्व असलेल्या राशीत राहतील आणि घराघरात गणपती बाप्पा विराजमान होतील. 1893 पूर्वी पेशवे आणि भारतीय लोक आपापल्या घरात श्रीगणेश जन्मोत्सव साजरा करत होते.

गणेश मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
घरात स्थापनेसाठी - सकाळी 7.30 ते 9 पर्यंत
दुकान आणि ऑफिसमध्ये स्थापनेसाठी - दुपारी 1.30 ते 4.30 पर्यंत
विद्यार्थी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापनेसाठी - संध्याकाळी 6 ते 7.30 पर्यंत

भारतासाठी शुभ राहतील गणेशोत्सवाचे हे योग
यावेळी गणेश उत्सवामध्ये चार ग्रह सूर्य सिंह राशीमध्ये, मंगळ मेषमध्ये, गुरु धनूमध्ये आणि शनी मकर राशीमध्ये राहील. हे चारही ग्रह आपापल्या स्वामित्व असलेल्या राशीमध्ये राहतील. या ग्रह योगामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात भारतासाठी शुभ राहणार आहे. सर्व ग्रहांची अनुकूलता आणि स्वतंत्र भारताची राशी कर्कसाठी हा काळ श्रेष्ठ राहील.

गुरु धनूमध्ये असल्यामुळे हा योग आणखी चांगला राहील. व्यापार उन्नती करेल आणि विश्वामध्ये भारताचे वर्चस्व वाढेल. नैसर्गिक संकटांपासून बचाव होईल. दहशतवाद नियंत्रणात राहील. जनतेसाठीसुद्धा हा काळ अनुकूल राहील.

बातम्या आणखी आहेत...