आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाचे आगमन:सर्वात उंच गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध खैरताबाद येथे यावेळी अवघ्या 9 फूटांची गणेश मूर्ती, मागील वर्षी 1 कोटी रुपयांत बनवली होती 61 फूट उंच मूर्ती

शशिकांत साळवीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी कोरोनामुळे कोणतेही मोठे आयोजन नाही, मूर्ती आणि सजावटीसाठी खर्च होतील 10 लाख रुपये - Divya Marathi
यावर्षी कोरोनामुळे कोणतेही मोठे आयोजन नाही, मूर्ती आणि सजावटीसाठी खर्च होतील 10 लाख रुपये
  • 1954 पासून खैरताबाद येथे दरवर्षी भव्य गणेश मूर्ती विराजमान केली जाते
  • यावर्षी कोरोनामुळे कोणतेही मोठे आयोजन नाही, मूर्ती आणि सजावटीसाठी खर्च होतील 10 लाख रुपये

देशभरात 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हैदराबादचे खैरताबाद सर्वात उंच गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. 1954 नंतर प्रत्येक वर्षी येथे गणेश मूर्तीची स्थापना केली जात आहे. यावर्षी कोरोनामुळे खैरताबादमध्ये फक्त 9 फूट उंच प्रतिमा स्थापन करण्यात येणार आहे. मागील वर्षी येथे 1 कोटी रुपये खर्चून 61 फूट उंच मूर्ती स्थापित केली होती.

खैरताबाद गणेश उत्सवाचे आयोजक एस. राजकुमार यांनी सांगितले की, यावेळी धन्वंतरी स्वरुपातील गणेशाची मूर्ती स्थापन करणार आहोत. भगवान धन्वंतरी आयुर्वेदाची देवता आहे. 5 ऑगस्टला आम्ही मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले होते. ही मूर्ती बनवण्यासाठी 8-10 कलाकार काम करत होते. 22 ऑगस्टपूर्वी ही मूर्ती तयार होईल. कोरोनामुळे या वर्षीचा गणेशोत्सव भव्य पद्धतीने साजरा करू शकणार नाहीत. गणेश मूर्ती व इतर सजावटीचे बजेट आम्ही 10 लाखांपर्यंत ठेवले आहे.

राजकुमार यांनी सांगितले की, मागील वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजन केले होते. सुमारे 1 कोटी रुपयांत 61 फूट उंच मूर्ती निर्मिती केली होती. या मूर्तीचे वजन जवळपास 50 टन होते. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. मूर्तीची उंची फक्त 9 फूट आणि वजन 500 किलो राहणार आहे. या वर्षीचे आयोजन खूप सामान्य असेल.

ही मूर्ती 2019 ची आहे. तिचे वजन सुमारे 50 टन होते. क्रेनच्या मदतीने तिला विसर्जित केले.
ही मूर्ती 2019 ची आहे. तिचे वजन सुमारे 50 टन होते. क्रेनच्या मदतीने तिला विसर्जित केले.

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणार

गणेश मूर्ती बनवणारे सर्व कलाकार सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे पालन करीत आहेत. सर्वजण मास्क लावून मूर्ती बनवत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

2018 मध्ये स्थापित गणेश मूर्तीचा हा फोटो आहे. इतक्या मोठ्या मूर्तीवर 100-150 किलो फुलांचा हार घालत होते.
2018 मध्ये स्थापित गणेश मूर्तीचा हा फोटो आहे. इतक्या मोठ्या मूर्तीवर 100-150 किलो फुलांचा हार घालत होते.

1954 पासून दरवर्षी साजरा केला जातोय गणेशोत्सव

खैरताबाद गणेश उत्सव समितीची स्थापना 1954 मध्ये स्वातंत्र्यसेनानी एस.के. शंकरय्या यांनी केली. तेव्हापासून येथे दरवर्षी गणपतीची भव्य मूर्ती बसवली जाते. एस. शंकरय्यानंतर त्यांचे बंधू एस. सुदर्शन यांच्यासह एस. राजकुमार आणि त्यांचा परिवार गणेशोत्सवाचे आयोजन करतात. गेल्यावर्षी येथे गणेशोत्सवात दररोज सुमारे 60-70 हजार लोक दर्शनासाठी आले होते. परंतू यावेळेस असे आयोजन होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...