आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा-पाठ:शनिदेव आणि महादेवासोबतच श्रीगणेशालाही अर्पण करावे शमीचे पान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गणेश उत्सव सुरु आहे. श्रीगणेश पूजेमध्ये विविध पूजन सामग्री अर्पण केली जाते. यामध्ये दुर्वा तसेच शमीचे पानही अर्पण केले जातात. देवी-देवतांना फुल-पाने अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार महादेवाला बेलाचे पान, श्रीगणेशाला दुर्वा, विष्णूदेवाला तुळशीचे पान आणि शनिदेवाला शमीचे पान प्रिय आहे. सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवाला अर्पण करतात. परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता.

श्रीगणेश पूजेने घर-कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेश पूजेमध्ये शमीच्या पानांसोबत तांदुळ, फुल आणि शेंदूरही अर्पण करावा.

या दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा...
मंत्र-
त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै।
शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।

श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावा
विविध देवी-देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदूराचेही विशेष महत्त्व आहे. विशेषतः शिव कुटुंब आणि महादेवाच्या सर्व अंश अवतारांवर शेंदुर अर्पण करण्याचे महत्त्व आहे. यामागील मान्यता अशी आहे की, शेंदूर महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या पारा धातूपासून बनते. महादेवाचे पुत्र शिगणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. खालील मंत्राचा उच्चार करत श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावा..

मंत्र-
सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्।।

बातम्या आणखी आहेत...