आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Ganesh Ji And Kuberdev Story, Ganesh Utsav 2022, We Should Remember These Things For Happiness In LifeGanesha Came To Eat At Kuberdev's House, Don't Be Proud Of Your Wealth, Ganesha Robbed Kuberdev Of His Pride.

कुबेरदेवाच्या घरी जेवायला आले होते गणपती:आपल्या संपत्तीचा करू नका गर्व, गणेशजींनी केले होते कुबेरदेवाचे गर्वहरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुबेरदेव हे देवांचे खजिनदार म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती. एकदा याच धनसंपत्तीचा कुबेरांना गर्व झाला. गर्वाच्या अतिरेकामुळे आपल्या या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी म्हणून त्यांनी भगवान महादेवांना जेवायला बोलवायचे ठरवले आणि कुबेरदेव थेट पोहोचले भगवान शंकराकडे.

कुबेरदेवाने भगवान महादेवांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह आपल्या महालात भोजनासाठी येण्याचे आमंत्रण दिले. भगवान भोलेनाथाला हे समजायला वेळ लागला नाही की कुबेरदेवाला आपल्या संपत्तीचा गर्व झाला आहे आणि आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याच्या इच्छेनेच तो येथे आला आहे. भगवान शंकर म्हणाले, कुबेरदेवा समजावले की देवा, मला हे आमंत्रण देण्याऐवजी तू गरजू लोकांना हे अन्न का पूरवत नाही.

मात्र कुबेरदेव ऐकण्याच्या कोणत्याही परिस्थितीत नव्हते त्यांनी उत्तर दिले, मी विश्वातील सगळ्यांना जेवू घालतो, पण मला आज आपल्या कुटुंबालाही जेवू घालावे अशी इच्छा आहे. तेव्हा तुम्ही माझ्या राजवाड्यात शाही भोजनासाठी यावे ही विनंती

महादेवाने विचार केला, देवाने असा गर्व करणे योग्य नाही त्यामुळे कुबेरदेवाचा गर्व दूर करण्यासाठी ते म्हणाला, मी आणि पार्वती जेवणासाठी येवू शकत नाही, मात्र तूम्ही हवे तर बाळ गणेशला घेऊन जा. पण एक लक्षात ठेवा बाळ गणेश लवकर तृप्त होणार नाही त्याची भूक ही खूप मोठी आहे.

हे ऐकून कुबेरदेव गर्वानेच म्हणाले, 'जर मी विश्वातील सगळ्यांनाच खाऊ घालू शकतो तर मी गणेशलाही संतुष्ट करू शकतो

निमंत्रण मिळताच गणेशजी कुबेरदेवाच्या महालात पोहोचले. कुबेरदेवांनी गणेशजींसाठी भरपूर पक्वांन्न, मिष्ठांन्न तयार केले होते. गणेशनेही आनंदाने जेवायाला सुरूवात केली.

बराच वेळ जेवण करूनही गणेशजींची भूक काही भागत नव्हती, त्यांचे समाधान काही झाले नाही. गणेशाला आपण सहज संतुष्ट करू म्हणणाऱ्या कुबेरदेवाने अखेर हाथ टेकले. कुबेरदेवांचे अन्न भांडार रिकामे झाले, पण गणेशजींची भूक काही शमत नव्हती.

शेवटी कुबेरदेवाला स्व:ताची चुक समजली, कुबेरदेवाने लगेच भगवान शंकराकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. काही वेळातच गणेशजीही तिथे पोहोचले. भगवान शंकराने माता पार्वतीला गणेशासाठी काहीतरी खाण्यासाठी घेवून येण्यास सांगितले.

माता पार्वतीजींने लगेच आपल्या लाडक्या गणेशसाठी अन्न आणले. देवी पार्वतीने बनवलेले अन्न खाल्ल्यानंतर गणेश हा तृप्त झाला त्याची भूक शमली.

ते पाहून कुबेरदेवांना आपली चूक कळली. कुबेरदेवाने लगेच भगवान शंकराची क्षमा मागितली आणि यापुढे कधीही गर्व न करण्याचा संकल्प केला.

त्यामुळे आपल्याला या कथेतून हेच शिकायला मिळते की कधीही आपल्या संपत्तीचा गर्व करू नये

बातम्या आणखी आहेत...