आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगादशहरा 9 जून रोजी:या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती देवी गंगा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा नदीला हिंदू धर्मात देवी आणि मातेचे रूप मानले जाते. गंगादशहरा तिच्या पृथ्वीवरील अवतरण स्मरणात साजरा केला जातो. गंगादशहरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो. यावेळी 9 जून रोजी देशभरात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. असे मानले जाते की जेव्हा माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली तेव्हा ती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी तिथी होती, तेव्हापासून ही तिथी गंगादशहरा म्हणून साजरी केली जाते.

गंगादशहरा उत्सवाशी संबंधित मान्यता
या उत्सवाविषयी असे मानले जाते की, या दिवशी गंगा मातेची पूजा केल्याने भगवान विष्णूंची अनंत कृपा प्राप्त होते. या दिवशी स्नान आणि दान केल्याने शरीर शुद्ध आणि मानसिक विकारांपासून मुक्त होते. अमृतदायिनी देवी गंगेच्या स्पर्शानेच मृत्यूलोकातील प्राणिमात्रांचा उद्धार होतो व त्यांचा मोक्ष मिळतो. त्यामुळे या दिवशी विधिनुसार पूजा करावी.

गंगादशहराशी संबंधित अशीही एक मान्यता आहे की, चंद्र हा जल तत्वाचा कारक आहे. दैनंदिन जीवनात आपण पाणी प्रदूषित करतो आणि याचे संवर्धन केले नाही तर मन विचलित आणि प्रदूषित होते. गंगादशहराच्या दिवशी सर्व गंगा मंदिरात महादेवाचा अभिषेक केला जातो. पूजेत चरणामृत स्वरूपात गंगाजल भक्तांना वाटले जाते.

दशमी तिथीची वेळ
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 9 जून रोजी सकाळी 8.21 पासून सुरू होईल आणि 10 जून रोजी सकाळी 7.25 पर्यंत राहील. यावेळी दशमी तिथी आणि हस्त नक्षत्र यांचा संयोग होत आहे. या तिथीचा स्वामी यम आहे आणि नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. पिता-पुत्राच्या या संयोगात स्नान आणि दान केल्याने शुभ फळ मिळेल. या दिवशी घरी गंगाजल मिश्रित पाण्यात स्नान केल्याने गंगेत स्नान केल्याचे फळ मिळते.

गंगा मंत्र आणि उपासना
या दिवशी पूजा आणि स्नान करताना मंत्र जपाचेही खूप महत्त्व आहे. यामुळे मोक्षदायिनी गंगा देवी प्रसन्न होऊन सुख-समृद्धी आणि धन-धान्याचा आशीर्वाद देते. यामुळे 'ऊँ नमः गंगायै विश्वरुपिणी नारायणी नमो नमः' या मंत्राचा जप करावा.

या दिवशी शक्य असल्यास, जवळच्या कोणत्याही गंगा मंदिरात जा आणि पूजा करा. गंगाजलाचे पात्र आणि गंगा मातेच्या चित्रासह घरीही पूजा करता येते.

बातम्या आणखी आहेत...