आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ संयोग:तीन मोठ्या योगांमध्ये साजरी होईल गंगा सप्तमी, स्नान-दानासह संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी गंगादेवीची पूजा करून गंगाजलाने स्नान केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो. यासोबतच पितृदोषाच्या शांतीसाठी हा दिवस शुभ मानला जातो.

या वर्षी गंगा सप्तमीला तिथी, वार आणि ग्रह व नक्षत्र मिळून तीन शुभ योग तयार करत आहेत. त्यामुळे हा पर्व अधिकच खास बनला आहे. या महासंयोगात वाहन, दागिने, मालमत्ता आणि कपडे खरेदी करणे शुभ राहील. यासोबतच या दिवशी गृहप्रवेश आणि नवीन सुरुवातही फलदायी ठरेल. या दिवशी गंगेच्या तीरावर श्राद्ध केल्याने पितृदोष संपतो आणि अकाली मृत्यू पावलेल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

रविपुष्य, श्रीवत्स आणि सर्वार्थसिद्धी योग
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, यावर्षी गंगा सप्तमीला रविपुष्य, श्रीवत्स आणि सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहेत. त्याचवेळी शनिवारी दुपारी ३ वाजता सप्तमी तिथी सुरू होईल. जी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील. रविवारी 8 मे रोजी सप्तमी तिथी सूर्योदयाची तिथी असल्याने तीन महायोगांचा संगम होणार आहे. या दिवशी श्रीवत्स योगासोबतच मुहूर्त राज मानला जाणारा रविपुष्य योगही तयार होत आहे. रविपुष्य योग सकाळी स्थानिक सूर्योदयाने सुरू होईल आणि दुपारी 2.56 पर्यंत राहील. सर्वार्थसिद्धी योगही यावेळी राहील.

गंगा सप्तमीशी संबंधित मान्यता
1
. धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की भगवान वामन यांनी राजा बळीकडून 3 पग जमीन घेताना त्यांचे तिसरे पाऊल ब्रह्मलोकात पोहोचले, तेथे ब्रह्मदेवांनी वामन देवाचे पद प्राक्षलन करून कमंडलूमध्ये घेतले. सगर राजाच्या 60 हजार मृत पुत्रांचा उद्धार करण्यासाठी राजा भगीरथाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवी गंगा महादेवाच्या जटांमध्ये आली. हा शुभ दिवस वैशाख शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी होता.

2. असेही म्हटले जाते की, जेव्हा महर्षी जाह्नू तपश्चर्या करत होते. तेव्हा गंगेच्या पाण्याच्या आवाजाने त्यांचे लक्ष पुन्हा-पुन्हा विचलित होत होते. त्यामुळे संतापून त्यांनी आपल्या तपाच्या बळावर गंगा नदी पिऊन घेतली. पण नंतर त्यांनी आपल्या उजव्या कानाने गंगा पृथ्वीवर सोडली. म्हणूनच हा दिवस गंगा प्रकट झाल्याचा दिवस मानला जातो. तेव्हापासून गंगेचे नाव जान्हवी पडले.

बातम्या आणखी आहेत...