आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूचे स्थान सर्वोच्चस्थानी:तथागत गौतम बुद्धांना शिष्याने विचारले- उपदेश करणारा नेहमी वर आणि श्रोता नेहमी खाली का बसतो

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय परंपरेत गुरूचे स्थान कायमच सर्वोच्चस्थानी राहीले आहे. आजचा दिवस गुरूचा दिवस ओळखला जातो. 5 सप्टेंबर म्हणजे आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. आज त्याच गुरूच्या महतीविषयी आपण जाणून घेणार आहोत. गुरूशिवाय ज्ञान नाही. आई-वडिलांनंतर योग्य आणि अयोाग्य यातील फरक सांगणारा व्यक्ती म्हणजे गुरूच असतो. गुरुच्या उपदेशानेच जीवन सफल होते. गुरूंचे स्थान सर्वोच्च आहे. म्हणूनच श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमानजी यांच्यासह सर्व देवी-देवतांना गुरूंकडून ज्ञान प्राप्त झाले आहे. श्रीरामांनी वशिष्ठजी आणि विश्वामित्र यांना गुरु केले होते. वनवासात श्रीरामांनी अनेक ऋषींच्या आश्रमात जाऊन सर्वांकडून ज्ञान घेतले. श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींना आपले गुरू मानले होते.

हनुमानजी म्हणाले- तुम्ही बोलत जा, मला ज्ञान मिळेल

हनुमानजींनी सूर्यदेवांना आपले गुरू बनवले. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते की, जेव्हा हनुमानाने सूर्यदेवाला गुरु होण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा सूर्याने नकार दिला. सूर्यदेवाने सांगितले होते की, मला प्रत्येक क्षणी फिरत राहावे लागेल. मी कुठेही क्षणभरही थांबू शकत नाही, अशा स्थितीत उपदेश करणे शक्य नाही. तेव्हा हनुमान म्हणाले की, तुमच्यासोबत चालत शिक्षण घेईन. तुम्ही बोलत जा आणि मला शिकवण मिळत राहील. सूर्याने यासाठी होकार दिला.

उपदेशक नेहमी वर का बसतो?

एकदा गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने विचारले की, तुम्ही प्रवचन देताना वर का बसता आणि आम्ही ऐकणारे खाली का बसून बसतो. गौतम बुद्धांनी शिष्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर मी तुला देईन, पण आधी तू मला सांग तू कधी झर्‍याचे पाणी प्यायले आहेस का? शिष्याने उत्तर दिले की होय, मी झऱ्याचे पाणी पिलेले आहे.

बुद्धांनी पुन्हा विचारले की त्यावेळी झऱ्याची स्थिती कशी होती? शिष्य म्हणाला की, झरा वरून वाहत होता आणि मी खाली उभा होतो. त्यास्थितीत मी पाणी पिलो होतो. तथागत गौतम बुद्धांनी शिष्याला समजावून सांगितले की, उपदेशक आणि श्रोता यांच्यासाठी ही एकमेव व्यवस्था आहे. प्रवचनही झऱ्यासारखे असते. ज्यांना उपदेश घ्यायचा आहे, उपदेशाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी तळाशी बसावे. उपदेशक वर बसेल आणि ऐकणारा बसेल. तरच योग्य ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू शकेल. ही व्यवस्था अहंकाराचाही नाश करते. गुरूसमोर अहंकार सोडला पाहीजे, गुरूचे शीक्षण आपले जीवन बदलू शकते.

बातम्या आणखी आहेत...