आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोक्षदा एकादशी आणि गीता जयंती रविवारी आहे. या उत्सवाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग राहील. एकादशी तिथीही दिवसभर राहील. त्यामुळे व्रत आणि उपासनेने मिळणारे शुभ फळ अधिक वाढेल.
पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र सांगतात की, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी विशेष मानले जाते. याला मोक्षदा एकादशी म्हणतात. मान्यतेनुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने या दिवशी कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीता ज्ञान दिले होते. या एकादशीचे व्रत करून भगवान श्रीविष्णूची पूजा करावी आणि भगवत गीतेच्या 11व्या अध्यायाचे पठण करावे.
असे करावे गीता पूजन
गीता जयंतीच्या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करावे. यानंतर भगवान श्रीविष्णूच्या श्रीकृष्ण रूपाला नमन करावे. त्यानंतर गंगाजल शिंपडून पूजास्थान स्वच्छ करावे. त्यानंतर तेथे चौरंगावर भगवान स्वच्छ कपडा ठेवून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती आणि श्रीमद भागवत गीता ग्रंथ ठेवावा. श्रीकृष्ण आणि श्रीमद्भागवत गीता यांना जल, अक्षत, पिवळी फुले, धूप-दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करा. यानंतर गीता पाठ करावा.
गीता दान केल्याने पुण्य मिळते
हे परम ज्ञान इतरांपर्यंत पोहाचवावे, असा उल्लेख खुद्द श्रीमद्भागवत गीतेत आहे. असे केल्याने पुण्य मिळते. त्याच वेळी, काही ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की, ग्रंथाचे दान हे महान दानांपैकी एक आहे. भगवंताच्या मुखातून निघणाऱ्या परम ज्ञानाचे दान केल्याने कळत-नकळत केलेली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.