आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Goddess Sita Had Appeared On Janaki Navami, On This Day One Gets The Virtuous Punya Of 16 Types Of Charity By Fasting | Marathi News

जानकी नवमी:या तिथीला देवी सीता झाली होती प्रकट, या दिवशी व्रत आणि उपासनेने मिळते 16 प्रकारच्या दानाचे पुण्य

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता जयंती साजरी केली जाते. या सणाला जानकी नवमी असेही म्हणतात. या दिवशी देवी सीता आणि श्रीराम यांची पूजा केली जाते. हा उत्सव 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी देवी सीतेचे प्राकट्य झाले होते. श्रीराम आणि सीता यांचा जन्म एकाच नक्षत्रात झाला होता.

धर्मग्रंथानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी पुष्य नक्षत्रात महाराज जनक यांना पृथ्वीमधून अपत्यप्राप्ती झाली होती. ग्रंथांमध्ये या दिवसाचे महत्त्व सांगताना देवी सीता आणि श्रीराम यांच्या पूजेसोबतच या दिवशी उपवासही करावा, असे सांगितले आहे. यामुळे पृथ्वी दानासहित सोळा प्रकारच्या महत्त्वपूर्ण दानाचे फळही मिळते.

नवमीचे महत्व
या दिवशी विवाहित महिलांनी व्रत केल्यास घरात सुख-शांती राहते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात. सीता या देवी लक्ष्मीचा अवतार असल्याचे मानले जाते. या दिवशी उपवास आणि व्रत केल्याने अनेक तीर्थयात्रा आणि दानधर्मासमान फळ मिळते अशीही मान्यता आहे.

जानकी यांची जन्मकथा
वाल्मिकी रामायणानुसार राजा जनक यांना अपत्य नव्हते. म्हणून त्यांनी यज्ञ करण्याचा संकल्प केला. ज्यासाठी त्यांना जमीन तयार करावी लागणार होती. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला पुष्य नक्षत्रात राजा जनक नांगराच्या सहाय्याने जमीन नांगरत असताना नांगराचा एक भाग जमिनीत अडकला. त्या ठिकाणी उत्खननात त्यांना मातीच्या भांड्यात एक कन्या दिसली. नांगरलेली जमीन आणि नांगराच्या टोकाला सीत म्हणतात, म्हणून सीता हे नाव ठेवण्यात आले.

सीता नवमीची पूजा
1.
सीता नवमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करावे.
2. यानंतर देवी जानकीला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि उपासनेचा संकल्प घ्यावा.
3. नंतर एका चौरंगावर माता सीता आणि श्रीराम यांची मूर्ती किंवा चित्र ठेवा.
4. राजा जनक आणि माता सुनयना यांच्या पूजेसोबत पृथ्वीचीही पूजा करावी.
5. यानंतर श्रद्धेनुसार दानाचा संकल्प करावा.
6. अनेक ठिकाणी मातीच्या भांड्यात भात, पाणी किंवा अन्न भरून दान दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...