आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता:रविवार आणि गुरु पौर्णिमेचा योग 5 जुलैला, या दिवशी सूर्य आणि गुरुची पूजा करण्याची प्रथा, बजरंगबलीने सूर्यदेवाकडून प्राप्त केली होती विद्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार आणि गुरुपौर्णिमेचा योग 5 जुलै रोजी आहे. आषाढ मासातील पौर्णिमेला गुरुची पूजा करण्याची परंपरा आहे. रविवारी गुरुपौर्णिमा असल्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचीही विशेष पूजा करावी. मान्यतेनुसार बजरंगबलीने सूर्यदेवाकडून वेदांचे आणि शास्त्राचे ज्ञान प्राप्त केले. या संदर्भात एक कथा प्रचलित आहे.

हनुमान आणि सूर्यदेव कथा 

केसरी आणि अंजनी यांनी आपला मुलगा हनुमान यांना विद्या प्राप्तीसाठी सूर्यदेवाकडे पाठवले होते. आई-वडिलांच्या आज्ञेनुसार हनुमान सूर्यदेवाकडे गेले आणि गुरु होण्याची प्रार्थना केली.

सूर्यदेव हनुमानाला म्हणाले, मी एक क्षणही थांबत नाही आणि रथामधून खालीही उतरू शकत नाही, अशा स्थितीमध्ये मी तुला ज्ञान कसे काय देऊ शकतो.

त्यावर हनुमान म्हणाले तुम्ही गती कमी न करत मला ज्ञान द्यावे. मी तुमच्यासोबत चालत-चालत ज्ञान ग्रहण करेल. सूर्यदेव तयार झाले.

सूर्यदेव चालत-चालत शास्त्राच्या गोष्टी सांगत जायचे आणि हनुमान ते सर्व ज्ञान ग्रहण करत होते. अशाप्रकारे हनुमानाने सूर्यदेवाकडून श्रेष्ठ ज्ञान प्राप्त केले. 

गुरुपौर्णिमेला करावा हनुमान चालीसा पाठ 

गुरुपौर्णिमेला सूर्यदेवासोबत हनुमानाची विशेष पूजा करावी. हनुमानसमोर दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. ऊँ रामदूताय नम: मंत्राचा जपही करावा.

बातम्या आणखी आहेत...