आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा-पाठ:11 मे पासून शनि मकर राशीमध्ये वक्री, अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी करावा शनि मंत्राचा जप

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • शनिदेवाला काळे तीळ आणि उडीद अर्पण करण्याची प्रथा, पूजेत निळे फुल अर्पण करावे

सोमवार, 11 मे पासून शनिदेव मकर राशीमध्ये वक्री राहतील. शनि वक्री झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सध्या धनु, मकर आणि कुंभ राशींना साडेसाती आणि मिथुन-तूळ राशींना ढय्या चालू आहे. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनि मंत्रांचा जप करावा. शनिदेवाला ग्रहांचे न्यायाधीश मानण्यात आले आहे. हा ग्रह मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनि पूजन करावे. येथे जाणून घ्या, शनिदेवाची पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

शनिदेवाची पूजा करताना तांब्याच्या भांड्याचा उपयोग करू नये, कारण तांब सूर्यदेवाचा धातू आहे. शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू मानले जातात. शनि पूजेमध्ये लोखंडाच्या भांड्यांचा उपयोग करू नये. लोखंड किंवा मातीचा दिवा लावा. लोखंडाच्या भांड्यात तेल भरून शनिदेवाला अर्पण करावे.

लाल कपड्यात लाल फळ किंवा लाल फुल शनिदेवाला अर्पण करू नये, कारण लाल रंगाच्या गोष्टी मंगळ ग्रहाशी संबंधित आहेत. हा ग्रहसुद्धा शनीचा शत्रू ग्रह आहे. शनिदेवाच्या पूजेमध्ये काळ्या किंवा निळ्या रंगांचा उपयोग करणे शुभ राहते. शनिदेवाला निळे फुल अर्पण करावे.

शनिदेव पश्चिम दिशेचे स्वामी मानले गेले आहेत. यामुळे यांची पूजा करताना शनि मंत्रांचा जप करताना भक्ताचे मुख पश्चिम दिशेला असावे.

शनिदेवाच्या मूर्तीच्या एकदम समोर उभे राहून दर्शन घेऊ नये. या संदर्भात मान्यता आहे की, असे केल्याने शनीची दृष्टी थेट भक्तावर पडते.

अस्वच्छ अवस्थेत शनि पूजा करू नये. अस्वच्छ म्हणजे, स्नान न करता, उष्ट्या तोंडाने किंवा अस्वच्छ कपडे घालून पूजा करू नये.

शनिदेवाला काळे तीळ आणि उडीद अर्पण करावेत. या दोन्ही गोष्टी शनिदेवाला विशेष प्रिय आहेत. शनि पूजेमध्ये या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...