आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा6 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. या दिवशी बजरंगबलीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. हनुमंताचे एक रूप म्हणजे पंचमुखी. हे रूप शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे. म्हणूनच पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने आत्मविश्वास, धैर्य वाढते आणि आपण कठीण गोष्टी सहज करू शकतो.
पंचमुखी अवतार कथा
उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि श्रीराम कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, हनुमानाने पंचमुखी अवतार घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांना अहिरावणापासून मुक्त केले होते. या संदर्भातील प्रचलित कथेनुसार त्रेतायुगात श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध सुरु होते. श्रीरामाच्या बाणांनी रावणाच्या सैन्याचा नाश होत होता.
प्रभू श्रीरामाला रोखण्यासाठी रावणाने आपल्या मायावी भाऊ अहिरावणला बोलावले. अहिरावण हे देवी भवानीचा भक्त होता. आपल्या साधनेचा उपयोग करून त्याने श्रीराम आणि लक्ष्मणांसह संपूर्ण वानरसेनेला एकाच वेळी बेशुद्ध केले. यानंतर तो श्रीराम आणि लक्ष्मणाला बरोबर घेऊन पाताळलोकात गेला.
काही काळानंतर जेव्हा अहिरावणाच्या शक्तीचा प्रभाव नष्ट झाला, तेव्हा विभीषणाला समजले की अहिरावणाने हे काम केले आहे. तेव्हा विभीषणाने हनुमानाला श्रीराम-लक्ष्मणाच्या मदतीसाठी पाताळलोकात जाण्यास सांगितले. विभीषणाने हनुमानाला सांगितले होते की, देवी भवानीला प्रसन्न करण्यासाठी अहिरावणाने पाच दिशांना दिवे लावले आहेत. जोपर्यंत हे पाच दिवे तेवत राहतील तोपर्यंत अहिरावणाला पराभूत करणे शक्य नाही. हे पाच दिवे एकत्र विझले तरच अहिरावणाची शक्ती संपुष्टात येईल.
विभीषणाच्या सांगण्यावरून हनुमान पाताळलोकात पोहोचले. तेथे अहिरावणाने एका ठिकाणी पाच दिवे लावल्याचे त्यांनी पाहिले. पाचही दिवे एकत्र विझवण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले आणि पाच दिवे एकाच वेळी विझवले.
यानंतर अहिरावणाची मायावी शक्ती संपली. हनुमान आणि अहिरावण यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये हनुमानाने अहिरावणाचा वध केला. अहिरावणाचा वध केल्यानंतर हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मणाला मुक्त केले आणि पुन्हा लंकेच्या रणांगणात नेले.
या कथेमुळे हनुमानाच्या पंचमुखी रूपाची पूजा केली जाते. हनुमानाच्या पंचमुखी स्वरूपाचे उत्तरेला वराह मुख, दक्षिणेला नृसिंह मुख, पश्चिमेला गरुड मुख, आकाशाकडे हयग्रीव मुख आणि पूर्वेला हनुमान मुख आहे.
जे भक्त हनुमानाच्या पंचमुखी रूपाची पूजा करतात, त्यांना भीती आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक ताण दूर होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी या स्वरूपाच्या चित्र किंवा मूर्तीसमोर बसून दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.