आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती-स्तुती:बजरंगबलीच्या 12 नावांची उपासना, हनुमान जयंतीला अवश्य करावा या नावांचा उच्चार

3 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • आज हनुमान जयंती, प्रत्येकाने करावे या 12 नावांचे स्मरण

आज (8 एप्रिल) हनुमान जयंती आहे. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानाचा जन्म झाला होता. शास्त्रामध्ये बजरंगबलीच्या विविध नावांचा उल्लेख आहे परंतु हनुमंताच्या स्तुतीसाठी विशेष 12 नावांचा जप केला जातो. यालाच हनुमान द्वादशनाम स्तोत्र असेही म्हणतात. या नावांचा जप करून भक्त विविध अडचणींमधून मुक्त होऊ शकतात. हनुमान द्वादशनाम स्तोत्रामध्ये पहिले नाव आहे हनुमान, दुसरे नाव अंजनीसुत, तिसरे नाव आहे वायुपुत्र, चौथे नाव महाबली, पाचवे नाव रामेष्ट म्हणजे श्रीरामाचे प्रिय, सहावे नाव आहे फाल्गुन-सखा म्हणजेच अर्जुनाचा मित्र, सातवे नाव पिङ्गाक्ष म्हणजे घारे नेत्र असलेले, आठवे नाव अमित विक्रम, नववे नाव उदधिक्रमण म्हणजे समुद्र अतिक्रमण करणारे, दहावे नाव आहे सीताशोक विनाशन म्हणजे देवी सीतेचा शोक दूर करणारे, अकरावे नाव लक्ष्मण प्राणदाता म्हणजे लक्ष्मणाला संजीवनी बूटीद्वारे जिवंत करणारे, आणि बारावे नाव आहे दशग्रीवदर्पहा म्हणजे रावणाचा अहंकार दूर करणारे.

संपूर्ण हनुमान द्वादशनाम स्तोत्र
ॐ हनुमान् अंजनी सूनुर्वायुर्पुत्रो महाबलः, श्रीरामेष्टः फाल्गुनसंखः पिंगाक्षोऽमित विक्रमः।
उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशनः, लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:। स्वाल्पकाले प्रबोधे च यात्राकाले य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत्। राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन।

बातम्या आणखी आहेत...