आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपासना:आज हनुमान जयंती, घरात राहूनच करावी पूजा आणि या मंत्राचा उच्चार

3 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, हनुमान पूजेचा सोपा विधी

आज बुधवार, 8 एप्रिल रोजी चैत्र मासातील पौर्णिमा आहे. या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. सर्व मंदिर बंद आहेत. अशा स्थितीमध्ये घरात राहूनच हनुमान पूजा करावी. घराबाहेर पडू नये. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, हनुमान पूजा कशाप्रकारे करू शकता... > सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघरात हनुमान पूजेची व्यवस्था करावी. पूजेमध्ये हनुमानाला गूळ, शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. > हनुमानाला तेल मिश्रित शेंदूर लावावा. दिवा लावून ऊँ रामदूताय नम: मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस  जप करावा.  > हनुमानासोबतच श्रीमाचीही पूजा करावी. पूजेमध्ये सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पाठ अवश्य करावा. > गरजू लोकांना धन आणि धान्य अवश्य दान करावे. या दिवशी शक्य असल्यास गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था करावी.

बातम्या आणखी आहेत...