आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी(21 ऑगस्ट, शुक्रवार) सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तर युवती चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेची पूजा करतात. हरितालिका म्हणजे उमा महेश्वराची पूजा. माता पार्वतीने महादेवासाठी ही पूजा केली होती. तेव्हापासून तरुणी, सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेला ही पूजा करतात. वर्षभर सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा जरी शक्य नसली, तर हरितालिकेला पूजा केल्यास बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.
सकाळी नदीवर जाऊन तेथील वाळू आणावी. या वाळूपासून शिवलिंग तयार करावे. शिवलिंगाला दूध, पाणी यांचा अभिषेक करून हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध चंदन वाहून पूजा करावी. त्यानंतर बेल आणि विविध वनस्पती अर्पण कराव्यात. यात आंबा, औदुंबर, पिंपळ, पळस, आघाडा, केवडा, दुर्वा यांच्यासोबत अनेक फुलांच्या फळांच्या वनस्पती वाहिल्या जातात. फुलामध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष मान आहे. फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचे पुष्प भगवान शंकरांना अतिप्रिय असते. यानंतर हरितालिकेची कथा वाचावी आणि हरितालिका, शंकराची आरती करून रात्री जागरण करावे. दुसर्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखूवन उपवास सोडावा. महादेव-पार्वतीच्या पूजेचे विसर्जन करावे.
पार्वतीची पूजा करताना पुढील मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ उमायै नम:, ऊँ पार्वत्यै नम:, ऊँ जगद्धात्र्यै नम:, ऊँ जगत्प्रतिष्ठïयै नम:, ऊँ शांतिरूपिण्यै नम:, ऊँ शिवायै नम:
महादेवाची उपासना करताना या मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ हराय नम:, ऊँ महेश्वराय नम:, ऊँ शम्भवे नम:, ऊँ शूलपाणये नम:, ऊँ पिनाकवृषे नम:, ऊँ शिवाय नम:, ऊँ पशुपतये नम:, ऊँ महादेवाय नम:
हा उपाय करावा
हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केशर मिसळून अभिषेक करावा. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. अविवाहित मुलींनी हा उपाय केल्यास मनासारखा पती मिळतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.