आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरक कथा:मदत व दान कधीही वाया जात नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्यूनंतर माणसाचे काय होते, असा विचार एका राजाच्या मनात आला. त्याने राज्यात दवंडी पिटवली की जो स्मशानात रात्रभर मृतदेहासारखे झोपून मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांचा अनुभव सांगेल त्याला बक्षीस मिळेल. अखेरीस एक कंजूष तयार झाला. त्याला स्मशानभूमीत नेण्यात आले. वाटेत एक फकीर त्याच्यामागे निघाला. फकीर म्हणाला, “आता तू मरणार आहेस तर तुझ्या पैशातून मला काही दे.’ फकिराने पाठलाग सोडला नाही तेव्हा कंजूष व्यक्तीने कब्रस्तानमध्ये पडलेल्या अक्रोडांची मूठभर टरफले फकिराला दिली. कंजूषाला कबरीत झोपवले गेले. त्याला श्वास घेता यावा म्हणून डोक्याच्या बाजूला लहानसे छिद्र ठेवले गेले. रात्री एक साप थडग्याजवळ आला आणि त्या छिद्रातून आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. साप छिद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना अक्रोडाचे टरफल त्यात अडकले होते. त्यामुळे साप त्यात प्रवेश करू शकला नाही. सकाळी त्याला राजासमोर उभे केले तेव्हा तो म्हणाला, ‘महाराज, दान मृत्यूनंतर सर्वात जास्त उपयोगी ठरते.’

तात्पर्य : एखाद्याला दान देणे किंवा मदत करणे कधीच वाया जात नाही. त्याचे फळ निश्चितच मिळते.