आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमंत ऋतू 14 जानेवारीपर्यंत:स्नान-दान आणि पूजेसाठी हा चांगला काळ, या काळात शक्तीही वाढते

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 नोव्हेंबरला सूर्यदेवाने वृश्चिक राशीत प्रवेश करताच हेमंत ऋतू सुरु झाला आहे. या दरम्यान थंडी सुरू होते. या ऋतूत कार्तिक आणि मार्गशीर्ष हे महिने असतील. दक्षिणायनचा हा शेवटचा ऋतू आहे. जो 14 जानेवारीपर्यंत राहील. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या राशी बदलामुळे शिशिर ऋतुसोबत उत्तरायणही सुरू होईल.

पितरांचा ऋतू
पुराणात हेमंतचे पितरांचा ऋतू असे वर्णन केले आहे. म्हणूनच कार्तिक महिन्यात पितरांसाठी विशेष पूजा आणि दान करण्याचा नियम आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात सूर्याची आराधना करून पितर तृप्त होतात. या दरम्यान सूर्योदयापूर्वी उठून, स्नान करून पूजा करून पितरांना प्रसन्न केले जाते.

स्नान-दान आणि पूजेसाठी विशेष काळ
हेमंत ऋतूमध्ये मन शांत आणि आनंदी राहते. ही स्थिती उपासना आणि भागवत भजनासाठी अनुकूल मानली जाते. म्हणूनच या ऋतूत श्रीकृष्ण पूजेबरोबरच स्नान दानाचीही परंपरा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, या ऋतूमध्ये सूर्य वृश्चिक आणि धनु राशीत राहतो. सूर्याच्या या स्थितीच्या प्रभावातून धर्म आणि परोपकाराचे विचार येतात.

हेमंत ऋतूमध्ये वाढते ताकद
हेमंतला रोगमुक्तीचा ऋतू म्हटले आहे. या ऋतूत पचनक्रिया चांगली होऊ लागते. भूक वाढू लागते. यासोबतच या काळात खाल्ल्या जाणाऱ्या आरोग्यदायी गोष्टीही शरीराला लवकर फायदे देतात. त्यामुळे या ऋतूत शारीरिक शक्ती वाढू लागते.

या ऋतूमध्ये ताजी हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामुळेच या ऋतूत सकाळी नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व धार्मिक ग्रंथात लिहिले आहे. सकाळी उठून नदीत आंघोळ केल्याने ताजी हवा शरीरात ऊर्जा निर्माण करते. या प्रकारच्या वातावरणामुळे अनेक शारीरिक व्याधी नष्ट होतात.

दक्षिणायनचा शेवटचा ऋतू
हेमंत ऋतू हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात असतो. या दरम्यान खाल्लेल्या गोष्टींमुळे शरीराची ताकद वाढू लागते. या ऋतूत सूर्य वृश्चिक आणि धनु राशीत राहतो. मंगळ आणि गुरूच्या राशीत सूर्याचे आगमन झाल्यामुळे हवामानात चांगले बदल सुरू होतात. त्यामुळे भूकही वाढू लागते. या ऋतूच्या शेवटी सूर्य उत्तरायण होतो. म्हणजेच उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो.

बातम्या आणखी आहेत...