आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी पंचांगभेदामुळे होलिका दहन काही ठिकाणी 6 मार्च तर काही ठिकाणी 7 मार्च रोजी होणार आहे. होळी दहनानंतर होलाष्टक संपेल. भक्त प्रल्हादच्या विजयाबरोबरच होळी हा नवीन पिकांचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचाही सण आहे. या दिवशी होळी पेटवताना धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, होलिका दहनाची रात्र ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाची आहे. या रात्री केलेली तंत्र साधना लवकर यशस्वी होते. ज्यांना मंत्र जप करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांच्या गुरूंचा सल्ला घ्यावा. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मंत्राचा जप केल्यास साधना लवकर यशस्वी होऊ शकते. जाणून घ्या या सणाशी संबंधित काही खास मान्यता...
होळीमध्ये धान्य का अर्पण केले जाते हे तुम्हाला माहीत आहे का?
या काळात विशेषत: गहू पिकण्यास सुरुवात होते. प्राचीन काळापासून पीक कापणी साजरी करण्याची परंपरा चालत आलेली आहे. पीक पक्व झाल्याच्या आनंदात होळी साजरी करण्याची आणि रंग खेळण्याची परंपरा आहे. नवीन पिकांचा काही भाग शेतकरी जळत्या होळीत अर्पण करतात. वास्तविक, जेव्हा पीक येते तेव्हा त्यातील काही भाग देवाला, निसर्गाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. जळत्या होळीत धान्य टाकणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. नवीन पिकासाठी देवाचे आभार मानण्याचाही हा सण आहे.
वसंत ऋतूच्या आगमनाचा सण आहे होळी
होळीपासून वसंत ऋतु देखील सुरू होतो. वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात आणि हा ऋतू होळीच्या रूपात साजरा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला, कामदेवाने भगवान शंकराची तपश्चर्या भंग करण्यासाठी वसंत ऋतुला प्रकट केले होते. महादेवांची तपश्चर्या भंग झाल्याने त्यांनी क्रोधात कामदेवाला भस्म करून टाकले होते. वसंत ऋतूच्या आगमनाने वातावरण प्रसन्न होते. प्राचीन काळी वसंत ऋतूचे आगमन विविध रंगांची उधळण करून साजरे केले जात असे. तेव्हापासून होळीला रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. त्या काळी फुलांपासून रंग बनवले जायचे.
भक्त प्रल्हादाची कथा
होळीच्या संदर्भात प्रल्हाद आणि होलिकाची कथा सर्वात प्रचलित आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यपुचा मुलगा प्रल्हाद हा श्रीविष्णूचा परम भक्त होता. हिरण्यकश्यपुला ही गोष्ट आवडली नाही. यामुळे त्याला प्रल्हादला मारायचे होते. असुर राजा हिरण्यकश्यपु ने खूप प्रयत्न केले, पण प्रल्हादला मारता आले नाही. तेव्हा असुरराजाची बहीण होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली. होलिकेला अग्नीत न जळण्याचे वरदान लाभले होते, पण श्रीविष्णू कृपेने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद वाचला. तेव्हापासून होलिका दहन हा सण प्रल्हादाचा विजय म्हणून साजरा केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.