आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा होलिका दहनाच्या तारखेबाबत पंचांगात मतभेद आहेत. या कारणास्तव काही ठिकाणी आज (6 मार्च) तर काही ठिकाणी उद्या (7 मार्च) होलिका दहन होणार आहे. होलिका दहनानंतर होळी खेळली जाणार, लोक एकमेकांना रंग लावतील. होळी हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु काही शहरे अशी आहेत जिथे देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक होळी पाहण्यासाठी पोहोचतात. अशा सात शहरांबद्दल जाणून घ्या, जिथे होळी खूप प्रसिद्ध आहे.
काशी : स्मशानातील होळी
काशी (वाराणसी) येथील मणिकर्णिका घाटावर खेळली जाणारी होळी जगप्रसिद्ध आहे. येथे स्मशानभूमीच्या राखेने होळी खेळली जाते. असे मानले जाते की भगवान शिवाने आपल्या गणांसोबत येथे अंत्यसंस्कार केलेल्या चितेची राख घेऊन होळी खेळली होती. या श्रद्धेमुळे आजही शिवभक्त येथे स्मशान होळी खेळतात.
बरसाना : लठमार होळी
श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेपासून सुमारे 50 किमी दूर असलेल्या बरसाणाची होळी खूप खास आहे. बरसाना येथे अनेक दिवस लठमार होळी खेळली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या आधीच लोक इथे होळी खेळायला लागतात. जवळच्या नांदगावातील पुरुष बरसाणा येथे येतात आणि बरसाण्यातील पुरुष नांदगावला जातात. या गावातील महिला पुरुषांना काठ्यांनी मारतात आणि पुरुष ढाल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ही होळी पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो लोक येतात.
मथुरा - वृंदावनची होळी
असे मानले जाते की, मथुरा-वृंदावनमध्ये श्रीकृष्णाने राधा आणि गोपीकांसोबत होळी खेळली होती. त्यामुळे या ठिकाणी होळीची धूम असते. मोठ्या संख्येने श्रीकृष्णाचे भक्त होळी खेळण्यासाठी मथुरा-वृंदावनला पोहोचतात. येथील मंदिरांमध्ये फुलांनी होळी खेळली जाते.
फालैन गाव: पंडा जळत्या होळीतून जातो
मथुरेपासून सुमारे ५० किमी अंतरावर फालैन हे गाव आहे. याला प्रल्हादांचे गाव असेही म्हणतात. फालैन गावातील होळीची खास गोष्ट म्हणजे येथे एक पंडा पेटलेल्या होळीतून चालत जातो. होळीच्या उंच ज्वाळामधून चालत बाहेर आल्यानंतरही पंडाचा केसही जळत नाही. हा चमत्कार पाहण्यासाठी देश आणि जगातील अनेक लोक येथे पोहोचतात.
हंपी : ऐतिहासिक होळी
कर्नाटकातील हंपीची होळीही जगभरात प्रसिद्ध आहे. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये समाविष्ट आहे. हे ठिकाण त्रेतायुगातील वानरसेनेशी संबंधित आहे. असे मानले जाते की सुग्रीव त्याच्या वानर सैन्यासह या भागात राहत होते. होळीच्या दिवशी येथे मोठा कार्यक्रम होतो. येथे हजारो लोक होळी खेळण्यासाठी येतात.
उदयपूर आणि पुष्करची होळी
राजस्थानमधील उदयपूर आणि पुष्कर हे शहरही होळीसाठी प्रसिद्ध आहेत. उदयपूरचे राजघराणे राजेशाही पद्धतीने होळी साजरी करतात. हा होळीचा सण पाहण्यासाठी अनेक लोक पोहोचतात. होळी खेळण्यासाठी परदेशी पर्यटक पुष्करमध्ये येतात. येथे कपडे फाडून होळी खेळली जाते.
इंदूर : रंगपंचमी
होळीनंतर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रंगपंचमीला रंग खेळले जातात. येथे दरवर्षी रंगपंचमीला इंदूरबरोबरच इतर शहरांतील लोकही रंग खेळण्यासाठी येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.