आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी 2023:जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या रंगांनी खेळावी होळी

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाल्गुन मासाच्या पोर्णिमेला होळीचे दहन केले जाते. तर, होळीच्या दुस-या दिवशी रंगांनी होळीचा हा सण साजरा केला जातो. यावेळी धुळवड 7 मार्च (मंगळवार) रोजी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात रंगांचे नाते ज्योतिष शास्त्राशी देखील जोडले गेले आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार राशीनुसार या रंगांनी होळी खेळल्यास जीवनात सुख-समृद्धी येण्यास मदत होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या रंगांनी होळी खेळावी...

मेष व वृश्चिक राशी
मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून मंगळाचा रंग लाल आहे आणि त्याची पुजादेखील लाल रंगाच्या सामग्रीने केली जाते. त्यामुळे मेष व वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंगाने होळी खेळणे अतिशय लाभदायक ठरू शकते. या रंगाने होळी साजरी केल्यास दोन्ही राशीच्या व्यक्तींना मान-सम्मान मिळेल तसेच क्रोधावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल. भूमिपासून लाभ मिळेल, कर्जातून सुटका होईल. विवाह ठरवण्यात अडचणी उद्भवणार नाही.

वृषभ व तूळ राशी
वृषभ व तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. नवग्रहांमध्ये शुक्र सर्वात चमकणारा ग्रह आहे. त्यामुळे वृषभ व तूळ राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावेत. या राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या अथवा आकाशी रंगांचा वापर रंग खेळण्यासाठी करावा. या रंगांमुळे वैभव प्राप्ती होण्यास मदत होईल. मित्र, नातेवाईक तुमचा मान-सम्मान करतील.

मिथुन व कन्या राशी
या दोन्ही राशींचा स्वामी बुध आहे. बुध हा ग्रह बुद्धी आणि वाणीशी संबंधित असणारा ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह हिरव्या रंगाचा प्रतिनिधि ग्रह आहे. मिथुन व कन्या राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी सकाळी गायीला हिरव्या रंगाचा चारा खाऊ घालावा. तसेच हिरव्या रंगाने होळीचा सण साजरा करावा. असे केल्याने व्यापारात आणि नोकरीच्या ठिकाणी मान-सम्मान प्राप्त होईल.

कर्क राशी
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा मन आणि धनासंबंधित असणारा ग्रह आहे. जो पूर्णपणे पांढरा आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी पिवळ्या, केशरी आणि हिरव्या रंगाने होळीचा सण साजरा करावा. असे केल्याने धन आणि सुख यामध्ये वाढ होण्यास मदत होईल. हिरवा रंगामुळे शांती मिळण्यास मदत होईल, संतान सुख मिळेल तसेच समाजात सम्मान मिळेल.

सिंह राशी
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, जो सर्व ग्रहांचा स्वामी आहे. लाल, पिवळा, मरुन आणि नारंगी हे रंग सूर्याशी संबंधित रंग आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी सकाळी सूर्याला लाल गुलाब मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे व लाल रंगाने रंग खेळावा. असे केल्याने खुप जास्त प्रमाणात ऊर्जेची प्राप्ति होण्यास मदत होईल. शरीरात शक्तिचा संचार होईल. बुद्धी प्रखर होईल.

धनु व मीन राशी
धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु धर्म, शुद्ध आचरण, सात्विक प्रवृत्ती आणि अधिक धन प्रदान करणारा ग्रह आहे. धनु व मीन राशीच्या व्यक्तींनी होळीच्या दिवशी सकाळी शंकराची पिवळ्या हळकुंडाने पुजा करावी व गरिबांना भोजन द्यावे. रंग खेळण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचा वापर करणे लाभदायक ठरेल. या रंगाच्या वापरामुळे या राशीच्या व्यक्तींना धन, मान-सम्मान तसेच यश मिळण्यास मदत होईल.

मकर व कुंभ राशी
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. शनि न्यायप्रिय तसेच मंद गतिचा ग्रह आहे. शनिचा रंग निळा आहे. शनि सात्विक आणि धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तींना कधीच कष्ट देत नाही. मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी होळीचा आनंद निळा, पांढरा, काळा या रंगांचा वापर लाभ देणारा ठरेल.

बातम्या आणखी आहेत...