आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळी उत्सवाबद्दल पहिल्यांदाच संभ्रमाचे वातावरण असले तरी महाराष्ट्रात हाेलिका दहन 6 मार्च तर धूलिवंदन 7 मार्च साजरे राेजी हाेणार आहे. देशातील 13 राज्यांत सूर्यास्त 6 वाजून 9 मिनिटांनंतर होणार असल्याने या ठिकाणी 6 मार्चला होलिकादहन केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर-पश्चिमी मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांचा समावेश आहे.
पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर-पूर्व छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा आणि आसाम या 7 राज्यांत 6 वाजून 9 मिनिटांपूर्वीच सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे या राज्यांत 7 मार्चला होलिकादहन करता येणार आहे. होळीदहनाच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन उत्सव होईल. महाराष्ट्रात मात्र होळी 6 मार्चलाच साजरी करावी, असे पंचांग तज्ज्ञांनी सांगितले. सायंकाळी 5 वाजून 3 मिनिटांपासून 6 वाजून 32 मिनिटांपर्यंतचा अमृत मुहूर्त आहे. 6 वाजून 32 मिनिटे ते 8 वाजून 3 मिनिटे या चर मुहूर्तात होलिकादहन करणे शुभ आहे, असे अभ्यासकांनी सांगितले आहे.
आज गुरु आणि शनि स्वतःच्या राशीत आहेत आणि शुक्र उच्च स्थितीमध्ये आहे. यासोबतच केदार, हंस, मालव्य, चतुष्चक्र आणि महाभाग्य असे पाच मोठे योग जुळून येत आहेत. ग्रह-ताऱ्यांचा असा दुर्मिळ संयोग गेल्या 700 वर्षांत तयार झाला नाही. या योगात होणारे होलिका दहन शुभ असेल.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, पुरी येथील सहाय्यक प्रो. डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, या योगांमधील होलिका दहन देशासाठी शुभ ठरेल. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत होईल. आजार कमी होतील.
होलिका दहन पूजन विधी
होळीच्या दिवशी पूजा कशी करावी याविषयी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपतीचे डॉ. कृष्ण कुमार भार्गव सांगतात की, होलिका पूजेपूर्वी भगवान नृसिंह आणि प्रल्हादांचे ध्यान करून नमस्कार करावा. त्यांना चंदन, अक्षत आणि फुले अर्पण करून अभिवादन करावे. यानंतर होळीची पूजा करावी. पूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
या दिवशी 7 प्रकारचे घरगुती पक्वान्न आणि पूजेच्या साहित्याने होलिकेची पूजा केली जाते. नैवेद्यही दाखवला जातो. यासोबतच होलिका दहन पाहणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की, ते मनाची नकारात्मकता देखील जाळून टाकते आणि मनाची उर्जा वाढवते.
होळीची राख कपाळावर का लावली जाते?
त्रेतायुगाच्या प्रारंभी, जेव्हा लोकांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर पहिला यज्ञ केला गेला तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्या डोक्यावर त्यातील थोडी राख लावली आणि हेवेत उडवली. यानंतर ऋषीमुनींनीही असेच केले आणि हवनातील भस्म अंगावर लावल्याने आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. डोक्यावर भस्म लावणे याला धुलीवंदन म्हणतात. त्यामुळे धुरवड सणाची निर्मिती झाली, त्या दिवशी आपण रंग खेळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.