फाल्गुन पौर्णिमा दोन दिवस:6 आणि 7 मार्च रोजी संध्याकाळी तुळस आणि होळीजवळ दिवा लावावा
या वर्षी पंचांगभेदामुळे होलिका दहन काही ठिकाणी 6 मार्च तर काही ठिकाणी 7 मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर होळी खेळली जाणार आहे. 6 आणि 7 मार्च रोजी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा असल्याने दोन दिवस विशेष पूजा करू शकता.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, होलिका दहन आणि होळी हे भगवान श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या उपासनेचे महान सण आहेत. फाल्गुन पौर्णिमेला विष्णू रूपातील भगवान सत्यनारायणाची कथा वाचावी व ऐकावी. या उत्सवाच्या संध्याकाळी तुळशीजवळ आणि होलिकाजवळ दिवा लावावा. जर तुमच्या शहरात 6 तारखेला होलिका दहन होत असेल तर 6 तारखेला आणि जर 7 तारखेला होलिका दहन होत असेल तर हा सण 7 मार्चला साजरा केला जाऊ शकतो.
बाल गोपाळाचा असा करावा अभिषेक
- पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरातील मंदिरात श्रीगणेशाची पूजा करावी.
- प्रथम पूज्य श्रीगणेशाला स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, हार आणि फुले अर्पण करावेत. धूप दिवे लावून नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. गणेशपूजनानंतर बाल गोपाळाची पूजा सुरू करावी.
- पौर्णिमेच्या दिवशी गोपाळाला पंचामृताने अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखरेचे मिश्रण करून पंचामृत तयार केले जाते.
- बालगोपाळाला प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे.
- स्नानानंतर नवीन पिवळे-चमकदार वस्त्रे परमेश्वराला घालावीत. हार आणि फुलांनी सजवावे. दागिने घालावेत.
- फळे, मिठाई, जानवे, नारळ, दक्षिणा इत्यादी शुभ वस्तू अर्पण करा. तुळशीची पाने टाकून लोणी-खडीसाखरेचा आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
- धूप आणि दिवे लावून आरती करावी. पूजेत कृं कृष्णाय नमः मंत्राचा जप करावा.
हे शुभ कार्यही पौर्णिमेला करू शकता
- पौर्णिमेला शिवलिंगावर जल आणि दुधाचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर बिल्वाची पाने आणि फुलांनी सजवावे. चंदनाचा टिळा लावावा. धोत्र्याची, रुईची फुले अर्पण करावीत. ऊँ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवे लावून आरती करावी.
- हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा. जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही सुंदरकांड पाठ करू शकता.
- गरजू लोकांना पैसे, धान्य, कपडे, बूट आणि चप्पल दान करा. गोठ्यात गाईंच्या संगोपनासाठी हिरवे गवत आणि पैसा दान करा.