आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलिक दहन आज:यावर्षी हस्त नक्षत्र आणि 6 योगात होईल होलिका दहन, हा प्रगती आणि समृद्धीचा संकेत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 28 मार्च म्हणजे आज फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथिला प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी होलिका दहन होईल. यावेळी हस्त नक्षत्रासोबतच 6 मोठे शुभ योगही राहतील. भद्रा काळ दुपारी 1:55 पर्यंतच राहील. त्यानंतर संपूर्ण दिवस शुभ राहील. यावर्षी होलिका दहनाची विशेष गोष्ट म्हणजे चंद्र आज आपल्याच नक्षत्रामध्ये राहील. यासोबतच 3 राजयोग आणि 3 इतर खास योग जुळून येत आहेत. हा एक दुर्लभ संयोग आहे. ग्रहांच्या या खास स्थितीमध्ये होलिका दहन होणे, देशासाठी प्रगती आणि समृद्धीचा संकेत आहे. उद्या 29 मार्च, सोमवारी रोजी धूळवड साजरी केली जाईल.

होलिका दहन मुहूर्त
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय जगन्नाथ पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार प्रदोष काळात होलिका दहन केले जाईल. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी. यावेळी प्रदोष काळात पौर्णिमा आणि हस्त नक्षत्राचा संयोग राहील आणि भद्रा दोष नसेल. यामुळे होलिका पूजन आणि दहनासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.38 ते रात्री 8.55 पर्यंत राहील.

होलिका दहनाने आनंद, सुख आणि समृद्धी
डॉ. मिश्र यांच्यानुसार यावेळी हस्त नक्षत्रामध्ये होळी साजरी केली जाईल. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. जो अमृत, सुख आणि समृद्धी कारक आहे. हा ग्रह उत्सव, उल्हास आणि आनंदाचाही कारक आहे. यामुळे मानसिक शांती आणि प्रसन्नता मिळते. आज फाल्गुन पौर्णिमा आहे आणि या तिथीचा स्वामीही चंद्र असल्यामुळे चंद्राचा प्रभाव जास्त राहील. यामुळे आजारापासून लढण्याची शक्ती मिळेल. हस्त नक्षत्र लक्ष्मी कारक मानले जाते, या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे लक्ष्मी योगाचे फळ मिळते.

बातम्या आणखी आहेत...