आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या होळीच्या तारखेबाबत पंचांगात मतभेद आहेत. काही ठिकाणी 6 मार्चला तर काही ठिकाणी 7 मार्चला होलिका दहन करण्यात येणार आहे. होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होते. होलिका दहनाच्या तारखेबाबत मतभेद असले तरी धुळवड 8 मार्चला खेळली जाणार आहे. होळी हा सण रात्र जागरणाचा आहे. या दिवशी रात्री जागे राहून मंत्रोच्चार आणि ध्यान करण्याची परंपरा आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं.मनीष शर्मा यांच्या मते, होळीच्या रात्री मंत्रोच्चार केल्याने पूजा लवकर यशस्वी होऊ शकते. गुरु मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की, होळीच्या रात्री केलेला मंत्रजप वर्षभर प्रभावी राहतो. होळी, दिवाळी, नवरात्री आणि शिवरात्री हे सर्व रात्र जागरणाचे सण आहेत. या सणांच्या दिवशी रात्री पूजा करण्याची परंपरा आहे. या रात्री तुमच्या कुळ देवतेची पूजा आणि मंत्रांचा जप करू शकता. या वर्षी होलिका दहनाच्या वेळी सूर्य आणि शनीचा योग कुंभ राशीत असेल. यानिमित्ताने तंत्र-मंत्र साधकांसाठीही हा उत्सव विशेष ठरणार आहे.
होळीच्या राखेचा उपयोग शिवपूजेत करू शकता
पं शर्मा यांच्यानुसार, होळी पेटवल्यानंतर जी राख उरते ती सामान्य नसते. होळीची राख अत्यंत शुभ मानली जाते. असे मानले जाते की होळीची राख पाण्यात मिसळून स्नान केल्याने अनेक ग्रहांचे दोष दूर होतात. होळीची राख शिवपूजेत भस्म म्हणून वापरता येते. भगवान शंकराला भस्म अर्पण करण्याची परंपरा आहे.
फाल्गुन पौर्णिमेला तुम्ही हे शुभ कार्य करू शकता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.