आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फीचर आर्टिकल :लोकांनी सच्चा मनातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रार्थना केल्यास प्रभू आवश्य ऐकतील - डॉ. अमित कामले

दिव्य मराठीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्य ग्रहाची बिघडती परिस्थिती सांभाळण्यासाठी लोक विविध पद्धतीने आपल्या व्यवहारात बदल करत आहेत. काही लोक प्लास्टिकचा वापर कमी करत आहेत, तर काही लोकांनी आपल्या खासगी वाहनाचा वापर सोडून सार्वजनिक वाहतूकीचा वापर सुरू केला आहे. कुणी कागदाचा वापर कमी केला, तर कुणी रस्त्यावर कचरा टाकणे बंद केले आहे. खूपच कमी लोक आहेत, की ज्यांनी पर्यावरण संरक्षणावर सार्थक गीत लिहिणे पसंत केले आहे.

विचारांची देवाण-घेवाण, अन्यायाला विरोध आणि लोकांना जागरुक करण्यासाठी संगीत सर्वात सशक्त माध्यमांपैकी एक ठरू शकते. एक कलात्मक अभिव्यक्ती म्हणून संगीत पिढ्या आणि भाषांच्या बंधनापासून दूर आहे. हे अतिशय कुशलरित्या लोकांना प्रभावित आणि आकर्षित करू शकते.

जागतिक पर्यावरण दिवस असेच गीत ऐकण्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. संगीत येणाऱ्या पिढ्यांसाठी हा ग्रह वाचवण्याचा संकल्प हाती घेणे आणि प्रेमळ होण्यासाठी भूमातेविषयी आभारी असणे किती आवश्यक आहे याची आठवण करून देते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्लोरिफाय क्राइस्ट 5 चे निर्माता पर्यावरणाविषयी जागरपक करण्याच्या प्रयत्नासह आपले नवीन सुसमाचार गीत 'प्रार्थना' या शीर्षकासह घेऊन आले आहेत. एक दृढ निश्चयी व्यक्ती आपल्या कार्याने समस्त जगाला कशा प्रकारे प्रभावित करू शकते हाच संदेश या गीतातून आपल्याला मिळतो. हे गीत पार्श्वगायक एश किंग यांनी गायले आणि याला सुसमाचार संगीतकार डॉ. अमित कामले M.D (रशिया) यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात साऱ्या जगाच्या कुशलतेसाठी विश्वास आणि आशेने भरपूर अशी प्रार्थना आहे.

विशेष म्हणजे, या गाण्याची रचना 24 मार्च 2020 ला लॉकडाउन लागू होण्यापूर्वी करण्यात आली होती. डॉ. अमित यांनी सांगितले, “मला आश्चर्य वाटतो की मला छंद त्याच दिवशी का सूचला? यामागे ईश्वराची इच्छा होती का? तथापी, मी ईश्वराच्या याच इच्छेचे पालन केले आणि त्यांनीच सूचवलेल्या मार्गावर चाललो. लॉकडाउनमध्ये 70 दिवसांच्या कालावधीत मी याच्या संगीत आणि थीमवर काम केले आणि अंतिम परिणामातून मी अतिशय आनंदी आहे. आमची नवीन रचना आपल्या जगाशी जवळच्या संबंधांवर आधारित आहे.

युवांना पर्यावरणपूरक अशी कामे आणि पर्यावरण नितीला प्रोत्साहन देणारी कामे करायला हवी. 17 वर्षीय ग्रेटा थनबर्ग सारख्या युवा हवामान बदल घडवून आणण्यासाठी एक रोल मॉडेल म्हणून काम करत आहेत.

डॉ. अमित यांना आश्चर्य वाटते की कदाचित प्रदूषण, हवामान बदल, पेयजल संकट आणि पर्यावरण विनाश सर्वांनी एकत्र येऊन सूड घेतला असावा. पवित्र बायबलमध्ये वर्णीत असलेल्या 10 आपत्तींचा संदर्भ देताना हे गीत निसर्गाच्या महिमेला वर्णित करत आहे, तेच निसर्ग ज्याचा ऱ्हास होत आहे. “गतवर्षी आपण पूराची दाहकता पाहिली आणि आता कोव्हिड 19 सह देशाच्या काही भागांमध्ये चक्रीवादळ आणि शेतकऱ्यांवर किड्यांचे संकट पाहायला मिळत आहे. पुढे काय होईल या भयावहतेची आपण कल्पना देखील करू शकत नाही.”

प्रदूषणापासून लोकसंख्येचा स्फोट, जंगलतोड आणि हवामान बदलापर्यंत आपले सुंदर ग्रह संकटात आहे. या सुसमाचार गीताच्या माध्यमातून स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही निसर्ग आणि पर्यावरणावर किती प्रेम करता. रोज प्रायश्चित्त करा आणि पर्यावरणासाठी प्रार्थना करा जेणेकरून येशू ख्रिस्त जगाचे भले करो.

0