आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Important Things Related To Shradh And Pitara | Performing Shraddha Between 11.36 Am To 12.24 Gives Satisfaction To Pitara

श्राद्ध आणि पितरांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी:सकाळी 11.36 ते 12.24 या वेळेत श्राद्ध केल्याने पितरांना मिळते संतुष्टी

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद महिन्यात सूर्य कन्या राशीत असताना पितरांचे श्राद्ध करावे असे अथर्ववेदात सांगितले आहे. त्यामुळे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रात दक्षिण दिशेला पितरांची दिशा मानण्यात आले आहे. तसेच पूर्वज चंद्र लोकात राहतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण असा नियम आहे.

श्राद्धासाठी दिवसाचा 8 वा मुहूर्त शुभ
पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र यांच्या मते, पितरांसाठी केलेले श्राद्ध शास्त्रात सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी केल्यासच फलदायी ठरते. त्यामुळे दिवसाच्या आठव्या मुहूर्तावर श्राद्ध करावे. या मुहूर्ताला कुतुप काळ म्हणतात. जो सकाळी 11.36 ते 12.24 च्या दरम्यान असतो. असे मानले जाते की, यावेळी पूर्वजांचे मुख पश्चिमेकडे वळते. यामुळे पूर्वज आपल्या वंशजांकडून श्रद्धेने अर्पण केलेले अन्न कोणत्याही अडचणीशिवाय ग्रहण करतात.

तर्पण, श्राद्धासाठी श्रेष्ठ वेळ कोणती आणि पितरांशी संबंधित आवश्यक गोष्टी

1. पितृ शांतीसाठी तर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ संगवकाळ मानली जाते, म्हणजे सकाळी 11.36 ते 12.24. या दरम्यान पाण्याने तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
2. पितृकार्य करण्यासोबतच पितरांच्या सुखासाठी पितृ स्तोत्राचे पठण करावे.
3. पितरांच्या भक्तीने पुष्टी, आयु, वीर्य आणि धनप्राप्ती होते असे पुराण सांगतात.
4. सर्वप्रथम वडील, त्यांच्या नंतर आजोबांना मग पणजोबांना पिंड द्यावे. ही श्राद्धाची पद्धत आहे.
5. तर्पण करताना वडील, आजोबा, पणजोबा इत्यादी नावांचा उच्चार स्पष्टपणे करावा.
6. प्रत्येक पिंडदान करताना गायत्री मंत्राचा जप करावा आणि एकाग्रतेने सोमाय पितृमते स्वाहा मंत्राचा जप करावा.
7. अग्नीमध्ये हवन केल्यानंतर पितरांसाठी जे पिंडदान दिले जाते, ते ब्रह्मराक्षसही दूषित करत नाहीत. अग्निदेवांना श्राद्धात उपस्थित पाहून राक्षस तेथून पळून जातात.
8. ब्रह्माजी, पुलस्त्य, वसिष्ठ, पुलह, अंगिरा, क्रतु आणि महर्षि कश्यप - हे सात ऋषी महान योगेश्वर आणि पितृ मानले जातात.

बातम्या आणखी आहेत...