आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ:गुह्येश्वरी शक्तिपीठ मंदिरात, पशुपतिनाथाच्या आधीमातेच्या दर्शनाची परंपरा, महामाया-कपाली रूपाची पूजा!

काठमांडू / अभय राज जोशी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिच्छवी कालखंडात समृद्ध शिवालय शैलीत मंदिराची निर्मिती झाली. मंदिराची वास्तुकला पॅगाेडा शैलीत आहे. राजा प्रपात मल्लाद्वारे १६५४ मध्ये या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला हाेता.

नेपाळमध्ये काठमांडू मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथील गुह्येश्वरी मंदिर वेगळ्या प्रकारचे आहे. हे शक्तिपीठ पशुपतिनाथ मंदिराच्या पूर्वेस बागमती नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे माता सती व शिवाच्या एकतेचे अद्भुत प्रतीक आहे. पशुपतिनाथाच्या आधी माता गुह्येश्वरीच्या दर्शनाची परंपरा येथे पाहायला मिळते. सध्या भारत व नेपाळमधून हजाराे भाविक येथे दाखल झाले आहेत. मंदिरात मातेची मूर्ती नाही, हे विशेष. मंदिराच्या गर्भगृहात एक छिद्र आहे. यातून जलधारा वाहू लागते. त्यास चांदीच्या कलशाखाली झाकलेले आहे. या मंदिरात सती व शिवाची पूजा हाेते. सतीला महामाया व शिवाला कपालीच्या रूपात पुजले जाते. दिव्य आकृतीजवळच भैरवकुंड आहे. भाविक या कुंडात हात टाकून हाती आलेल्या गाेष्टीला परमात्म्याचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतात.

गुह्येश्वरी तांत्रिक अनुष्ठानांसाठी देखील परिचित आहे. शक्ती मिळवण्याची इच्छा असलेले लाेक येथे पूजेसाठी येतात. मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुमीत खडकी म्हणाले, मंदिरात विशेष शक्ती असल्याचे भाविक सांगतात. देवी सती महाअष्टमी, नवमीला पूजा करणाऱ्यांची कामना पूर्ती करतात. नवरात्रीच्या निमित्त विशेष काळरात्री पूजा हाेते. खडकी म्हणाले, गेल्या वर्षी काेराेनामुळे भाविकांची संख्या मर्यादित हाेती. परंतु यंदा भाविकांची संख्या जास्त आहे. भारतातून माेठ्या संख्येने भाविक येत आहेत. मंदिराजवळ हाॅटेलातही भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ हाेत आहे. बिहारच्या सीतामढीचे रहिवासी राम कुमार यादव दर्शनासाठी आले आहेत. ते म्हणाले, देवीला मुलाची कामना सांगण्यासाठी आलाे आहे. मला अनेक दिवसांपासून येथे येण्याची इच्छा हाेती. परंतु महामारीमुळे सीमा बंद हाेती. अडचण हाेती. आता सीमा खुली झाली आहे. म्हणून येण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...