आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकदा उभी चढण असलेल्या डोंगरावर चढण्याची स्पर्धा होती. स्पर्धक डोंगरावर चढताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. प्रत्येक जण म्हणत होता, “ही उभी चढण आहे, यावर चढणे अशक्य आहे.’ हे ऐकून काही स्पर्धक चढले नाहीत, काही थोड्या उंचीवर जाऊन घसरले आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न केला नाही. त्यांना पाहून लोक मोठ्याने म्हणू लागले की, ही स्पर्धा कोणीही जिंकू शकत नाही, कारण या डोंगरावर चढणे अशक्य आहे.
उर्वरित स्पर्धकही यामुळे निराश झाले, परंतु त्या दोघांमधील एक स्पर्धक वारंवार खाली पडल्यानंतरही प्रयत्न करत राहिला आणि शेवटी तो उभी चढण असलेल्या डोंगरावर चढला. त्याला विजेता घोषित करण्यात आले. तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी त्याला विचारले की, तुम्ही हे अशक्य काम कसे केले? तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? पण त्या स्पर्धकाने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग मागून एक आवाज आला, ‘अहो, त्याला काय विचारताय? तो तर जन्मतःच बहिरा आहे.’
शिकवण : यशासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच उत्तम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.