आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगन्नाथ रथयात्रा:मंदिराच्या आतच होणार रथयात्रेच्या परंपरा, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आज पुरी बंद 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने मंदिर समितीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे दिले निर्देश

पुरी - भगवान जगनाथ रथयात्रेवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर ओडिशा सरकारने मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाला या निर्णयाचे पालन करण्यात सांगितले आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे सांगितले.

सरकारने सांगितले आहे की, रथयात्रेशी संबंधित परंपरा मंदिरामध्येच पूर्ण करून घ्याव्यात. दुसरीकडे पुरी येथे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात 12 तासांचा बंद ठेवण्यात आला आहे.

एका जनहित याचिकेवरील सुनावणीमध्ये गुरुवारी सुप्रीम कोर्टाने रथयात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात श्रीजगन्नाथ सेना आणि श्रीक्षेत्र सुरक्षा वाहिनी नावाच्या दोन संघटनांनी पुरी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. आज सकाळी 6 पासून पुरी शहर बंद आहे.

शुक्रवारी दुपारी जगन्नाथ मंदिर समितीची बैठक होणार आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर विचार केला जाऊ शकतो. रथयात्रा निघाली नाही तर अशा स्थितीमध्ये परंपरांचे पालन कसे होणार याविषयी समितीचे सदस्य पुरी मठाचे शंकराचार्य जगतगुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचेही मार्गदर्शन घेतील.

बातम्या आणखी आहेत...