आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला सीता नवमी साजरी केली जाते. पुराणानुसार या दिवशी माता प्रकट झाली होती. माता सीता ही पृथ्वी मातेची कन्या होती. त्यामुळे वनवासाच्या काळात सती अनुसुईयांनी त्यांना दिव्य दागिने दिले होते. जेव्हा रावणाने देवी सीतेचे अपहरण केले तेव्हा त्यांचे अपहरण करून त्यांना लंकेत नेले असल्याचे याच दागिन्यांवरून प्रभू श्रीरामाला समजले. जाणून घ्या त्या दैवी अलंकारांबद्दल...
रामायणातील एका कथेनुसार, जेव्हा रावण देवी सीतेचे अपहरण करून त्यांना विमानातून लंकेला घेऊन जात होता तेव्हा देवी सीतेने आपले दागिने त्या विमानातून खाली फेकले होते. पण वनवासात असताना त्यांच्याकडे दागिने कुठून आले हे अनेकांना माहीत नाही. यामागे अशीही एक कथा आहे की, वनवासाच्या सुरुवातीला देवी सीतेला दैवी दागिने आणि वस्त्र दिले गेले.
सती अनुसूया यांनी दिले होते वस्त्र व दागिने
कथेनुसार, वनवासाच्या सुरुवातीला जेव्हा श्रीराम-लक्ष्मण आणि देवी सीता अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा ऋषींनी श्रीराम आणि सीता दोघांचे स्वागत केले. जेव्हा देवी सीता सती अनुसूया यांना भेटायला गेल्या तेव्हा सीता यांनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर देवी सीताला आपल्या कन्यासारखे प्रेम देऊन त्यांनी दिव्य वस्त्रे दिली. यानंतर देवी सीतेला पत्नी धर्माचाही उपदेश देण्यात आला.
दागिन्यांतूनच मिळाले होते देवी सीतेचे संकेत
रामचरित मानसच्या किष्किंधा कांडामध्ये असा उल्लेख आहे की, जेव्हा देवी सीतेचे रावणाने अपहरण केले तेव्हा सीताजींनी आपले दागिने विमानातून फेकले जेणेकरून वाटेत ते जे कोणाला सापडतील आणि त्यांना सीतेबद्दल संकेत मिळू शकेल. हे दागिने वानरराजा सुग्रीवाला सापडले आणि त्यांनी ते दागिने आपल्याजवळ सांभाळून ठेवले आणि नंतर जेव्हा ते श्रीरामांना भेटले, तेव्हा हे दागिने श्रीरामांना दाखवले. त्या आधारावर श्रीरामाने पुढील रणनीती आखली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.