आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्ण जन्माष्टमी 18 आणि 19 ऑगस्टला:मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे 19 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी होणार, पुरीमध्ये 18 तारखेला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाही जन्माष्टमी दोन दिवसांची आहे. काही पंचांगांमध्ये 18 ऑगस्ट आणि काहींमध्ये 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर झाला असून हे दोन्ही योग येत्या शुक्रवारी राहतील, त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणे अधिक शुभ राहील कारण हा उत्सव कृष्ण तीर्थक्षेत्रात 19 तारखेला आहे.

अखिल भारतीय विद्वत परिषद आणि काशी विद्वत परिषदेचे म्हणणे आहे की, 18 तारखेला अष्टमी तिथी सूर्योदयाच्या वेळी राहणार नाही तर रात्री राहील. त्याचवेळी 19 तारखेला अष्टमी तिथीला दिवस सुरू होऊन रात्रीही राहील. त्यामुळे जनामाष्टमी केवळ शुक्रवारीच साजरी करणे चांगले राहील. श्रीकृष्णाचे जन्म नक्षत्र रोहिणी देखील याच रात्री राहील. उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये जन्माष्टमी 19 ऑगस्टलाच साजरी केली जाईल.

श्रीकृष्ण तीर्थक्षेत्रात 19 रोजी जन्माष्टमी साजरी होणार
श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरा येथे 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी होणार आहे. वृंदावनातील बांके बिहारी मंदिराचे सेवा अधिकारी पं. अंकित गोस्वामी यांनीही श्रीकृष्णाच्या जन्माची 19 तारीख सांगितली आहे. त्याचवेळी गुजरातमधील द्वारकेच्या कृष्ण मंदिराचे पुजारी पं. प्रणव ठाकर सांगतात की, यावेळी शुक्रवारी श्रीकृष्णाची जयंती साजरी करणे शुभ असेल, मात्र पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या पंचांगानुसार 18 तारखेला रात्री अष्टमी तिथी सुरु होत असल्यामुळे गुरुवारी कृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे.

पुराणात काय लिहिले आहे
1.
विष्णू आणि ब्रह्म पुराणानुसार, भगवान विष्णू योग मायेला म्हणजेच देवींना सांगतात की, मी पावसाळ्यात श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या रात्री जन्म घेईन आणि नवमीला तू प्रकट होशील.

2. ब्रह्मवैवर्त पुराणात असे लिहिले आहे की, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या रात्री शुभ लग्नावर शुभ ग्रहांचे दर्शन होते. त्यावेळी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र या योगामुळे जयंती नावाचा योग तयार होत होता. तेव्हा वृषभ लग्नात श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

3. भविष्य पुराणानुसार, भगवान सांगतात की, ज्या वेळी सूर्य सिंह राशीत आणि चंद्र वृषभ राशीत होता, तेव्हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीच्या मध्यरात्री माझा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला.

4. अग्नी पुराण सांगते की श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रासह भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. त्यामुळे या अष्टमीला त्यांची जयंती साजरी केली जाते.

5. देवी भागवत पुराणानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत भगवंताचा जन्म देवकीच्या गर्भातून परम पुरुषाच्या रूपात झाला.

6. हरिवंश पुराणात असे लिहिले आहे की, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी अभिजित नक्षत्र, जयंती योग आणि विजय मुहूर्त होता.

जन्माष्टमीला काय करावे
या सणात सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावे. यासाठी गंगाजलचे काही थेंब आणि काळे तीळ पाण्यात मिसळून आंघोळ करावी. त्यानंतर कृष्ण मंदिरात जाऊन पंचामृत आणि शुद्ध पाणी परमेश्वराला अर्पण करावे. यानंतर पिवळे वस्त्र, पिवळी फुले, अत्तर आणि तुळशीची पाने अर्पण करा. नंतर मोराची पिसे अर्पण करा. शेवटी लोणी-खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. या प्रकारची पूजा घरीही करता येते.

बातम्या आणखी आहेत...