आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातील पहिला सण:14 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने दूर होते पाप

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या आठवड्यात 14 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. विशेषत: या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.

ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व
पंचांगानुसार ज्येष्ठ महिना हा हिंदू वर्षातील तिसरा महिना आहे. या काळात पृथ्वीवर तीव्र उष्णता असते, त्यामुळे या महिन्यात पाण्याचे महत्त्व इतर महिन्यांच्या तुलनेत वाढते. ऋषीमुनींनी पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे रक्षण करण्याचा संदेश दिल्याचे शास्त्र आणि पुराणातही नमूद आहे.

असे केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात असे मानले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात नद्यांची माता म्हणून पूजा करण्याचे महत्त्व आहे. यासोबतच या दिवशी दान केल्याने पितरांना शांती आणि मुक्ती मिळते. या दिवशी महिला विशेषत: पतीला दीर्घायुष्य, घरातील सुख, समृद्धी आणि शांती यासाठी व्रत करतात.

महादेव आणि श्रीविष्णूंची पूजा करावी
या दिवशी भगवान शंकर आणि श्रीविष्णूंची विशेष पूजा करावी. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, ध्यान करणे आणि पुण्य कर्म करणे हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अविवाहित तरुण-तरुणीही या दिवशी विशेष पूजा करू शकतात. या दिवशी शुभ्र वस्त्रे परिधान करून भगवान शंकराची पूजा करून अभिषेक केल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते.

पौर्णिमेच्या दिवशी काय करावे
1.
असे मानले जाते की या विशेष दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करतात. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा करावी.
2. कच्चे दूध पाण्यात मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.
3. पिंपळ आणि कडुनिंबाच्या झाडाखाली विष्णु सहस्रनाम किंवा शिवाष्टक पठण केल्याने ग्रह दोष दूर होतात.
4. या दिवशी विवाहितांनी चंद्रदेवाला अन्न, दूध, दही, फुले मिसळून अर्घ्य अर्पण करावे. यामुळे प्रत्येक लहान-मोठ्या समस्या दूर होतात.

बातम्या आणखी आहेत...