आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पौर्णिमा:या दिवशी झाडे लावल्याने आणि त्यांना पाणी दिल्याने मिळणारे पुण्य कधीही संपत नाही

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 14 जून रोजी आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच वृक्षारोपण करण्याचीही परंपरा आहे. ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असतो तेव्हा त्या काळात येणार्‍या पौर्णिमेच्या तिथीला झाडे लावल्याने किंवा त्यात पाणी टाकल्याने मिळणारे पुण्य कधीच संपत नाही. तसेच या ग्रहांच्या संयोगात केलेल्या स्नान-दानाने कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात.

पुराणानुसार दान करावे आणि झाडे लावावीत
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्या मते पौर्णिमा सणाला झाडे लावल्याने कधीही न संपणारे पुण्य मिळते. या दिवशी वृक्ष आणि वनस्पतींना पाणी घातल्याने देवता आणि पितर प्रसन्न होतात, तसेच ग्रहांचा अशुभ प्रभावही कमी होतो.

गरुड, पद्म आणि स्कंद पुराणातील परंपरेनुसार या सणाला गरजूंना दान केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळते. कारण ज्येष्ठ महिन्यात अन्न, पाणी, वस्त्र, छत्री, पादत्राणे दान करण्याची परंपरा आहे.

पिंपळ, आवळा आणि तुळशीने मिळेल अश्वमेध यज्ञाचे फळ
पद्म, विष्णुधर्मोत्तर आणि स्कंद पुराणात पिंपळ, आवळा आणि तुळस लावल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते असे सांगितले आहे. इतर पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की या पवित्र वृक्ष आणि वनस्पतींचे रोपण केल्याने अश्वमेध यज्ञाइतके पुण्य प्राप्त होते. यासोबतच कडुलिंब, बिल्वपत्र, वड, चिंच आणि आंब्याची झाडे लावल्याने नकळत होणारी सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. ही झाडे लावल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटकाही होते.

पौर्णिमेला काय करावे
सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावे. जर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊ शकत नसाल तर घरातील पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करा. यानंतर आणि दानाचा संकल्प घेऊन गरजू लोकांना पाण्याचा मठ, पंखा आणि छत्री दान करू शकता. या दिवशी भगवान शिव-पार्वतीची पूजा करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. मंदिरात जाऊन दुधात पाणी मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर पिंपळाला जल अर्पण करावे. झाडाखाली तुपाचा दिवा ठेवून प्रदक्षिणा घालावी. संध्याकाळी शिवमंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

राशीनुसार ही झाडे लावू शकता
1. मेष:
आंवला, जास्वंद, शमी
2. वृषभ: जास्वंद, जामुन, खैर किंवा उंबर
3. मिथुन: खैर, शिसम, बांबू किंवा आघाडा
4. कर्क : बांबू, पिंपळ, नागकेशर किंवा पलाश
5. सिंह : वड, पलाश, लघुपिंपरी, रुई
6. कन्या : लघुपिंपरी, आघाडा, बेल आणि दुर्वा
7. तूळ : बेल, अर्जुन, बकुळ, उंबर
8. वृश्चिक : लिंबाचे झाड, बकुळ, देवदार
9. धनु : पिंपळ, केळी, अशोक, फणस
10. मकर : शमी, बाभळ, फणस
11. कुंभ : शमी, कुशा, कर्दळ, आंबा
12. मीन : आंबा, पिंपळ, कडुनिंब

बातम्या आणखी आहेत...