आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या:या दिवशी स्नान-दान आणि पितरांच्या पूजेने मिळते पुण्य

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या 23 नोव्हेंबरला आहे. या दिवशी तीर्थक्षेत्रात किंवा पवित्र नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. अमावस्येला श्राद्ध केल्याने पितरांना संतुष्टी मिळते. पुराणानुसार कार्तिक महिना हा भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या महिन्यांपैकी एक मानला जातो. म्हणूनच या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे.

कार्तिक अमावस्या तिथी : पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची अमावस्या बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 06.50 पासून सुरू होईल. जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.26 पर्यंत राहील. अशाप्रकारे 23 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या असेल.

पितरांचा सण : या दिवशी स्नान, दान, पितरांना नैवेद्य, श्राद्ध केल्याने लाभ होतो. पितरांसाठी तर्पण करणे, अशुभ दोष दूर करणे इत्यादीसाठी कोणत्याही महिन्याची अमावस्या अतिशय शुभ मानली जाते. कार्तिक अमावस्या तिथीला लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप फलदायी आहे.

व्रत ठेवा : शक्य असल्यास कार्तिक अमावस्येच्या दिवशी उपवास ठेवा आणि आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्न, वस्त्र इत्यादी दान करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. यासोबतच या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा श्रवण केल्याने सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते असेही मानले जाते.

महत्त्व : अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. स्नानाच्या पाण्यात पवित्र नद्यांचे पाणी मिसळून तुम्ही घरीही स्नान करू शकता. कालसर्प दोष, पितृदोष निवारण इत्यादींसाठीही हा दिवस शुभ मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...