आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी कार्तिक अमावस्या:पितरांसाठी धूप-ध्यानाचा शुभ योग, अमावास्‍येला तीर्थ दर्शन आणि नदी स्नानाची प्रथा

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 23 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील अमावस्या आहे. या दिवशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष संपेल आणि 24 तारखेपासून मार्गशीर्ष मास सुरू होईल. कार्तिक महिन्यातील अमावस्या हा सण मानला जातो. या दिवशी पूजा-पाठ, धूप-ध्यान आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व अधिक आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते बुधवारी अमावस्या असल्याने या दिवशी श्रीगणेशाची पूजा करणे शुभ राहील. यासोबतच या दिवशी बुध ग्रहाचीही पूजा करावी.

अमावस्येला पितरांसाठी धूप-ध्यान करावे
- कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी धूप-ध्यान, श्राद्ध, तर्पण इत्यादी शुभ कर्मे करावीत. धूप-ध्यानासाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर करावा. गोवरी जाळून त्या निखाऱ्यावर पितरांचे ध्यान करत गूळ-तूप टाकावे. धूप देताना घरातील सर्व पितरांचे ध्यान करावे.

- दुपारी 12 नंतरच धूप-ध्यान करावे, कारण पितरांशी संबंधित शुभ कर्मे करण्यासाठी दुपारची वेळ सर्वोत्तम मानली जाते.

- पितरांच्या तृप्तीसाठी धन, धान्य आणि उबदार वस्त्र दान करावेत.

कार्तिक अमावास्येला करावे नदी स्नान

  • या दिवशी सकाळी लवकर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. जर तुमच्या शहरात किंवा आजूबाजूला कोणतीही नदी नसेल आणि तुम्ही कोणत्याही तीर्थस्थळी जाण्याचा विचार करत नसाल तर तुम्ही घरी नद्यांचे स्मरण करून स्नान करू शकता.
  • अमावस्येला नदीत स्नान केल्यानंतर तेथील गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार पैसे, धान्य, ब्लँकेट, उबदार कपडे दान करावेत. मंदिरात पूजा साहित्य दान करावे.

अमावस्येला करू शकता हे शुभ कार्य

  • अमावस्येला शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि दिवा लावून ऊँ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. रुद्राक्षाच्या माळेने मंत्राचा जप करावा.
  • हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पाठ करावा.
  • बुधवारी श्रीगणेशाचा अभिषेक करावा. दुर्वा अर्पण कराव्यात. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. दिवा लावून आरती करावी. गणेशाच्या श्री गणेशाय नमः मंत्राचा जप करावा.
बातम्या आणखी आहेत...