आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गणरायाच्या प्रतिमा व आकृतीत विज्ञान, धर्म आणि अध्यात्माचा अद्भुत समन्वय दिसताे. लंबाेदर म्हणजे माेठे पाेट असलेला. गणपतीचे माेठे पाेट त्यांची भाेजनप्रियताच नव्हे तर पचनशक्तीचीही अनुभूती देते. ज्यांच्या जीवनात विवेकाची साथ असते ते सर्व प्रकारचे भाेजन व गाेष्टी याेग्य पद्धतीने पचवू शकतात. चांगली पचनशक्ती असेल तर आराेग्यही चांगले राहते. आजच्या काळात स्वस्थ आरेाग्याला सर्वांचेच प्राधान्य आहे.
कथा : मोहासुर आणि कामदेवाचा उद्धार
तारक राक्षसापासून संरक्षण मिळावे म्हणून सर्व देव-देवतांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. मात्र ते समाधिस्थ हाेते. मग हे देव पार्वतींकडे गेले. शंकराला समाधी अवस्थेतून बाहेर आणण्यासाठी पार्वतींनी भिल्ल महिलेचे रूप धारण केले. तेव्हा शंकराच्या अंशातून लंबाेदरचा जन्म झाला. शंकराला कामदेवाचा प्रचंड राग आला, कारण त्याच्यामुळे शंकराची तपश्चर्या भंगली हाेती. त्यांनी कामदेवालाच भस्मसात केले. इकडे, माेहासुर राक्षसही देवतांना त्रस्त करत हाेता, तेव्हा देवतांनी गणेशाकडे मदत मागितली. गणेशाने लंबाेदराचा अवतार घेऊन माेहासुराला कैद केले. लंबाेदराने माेहासुराला बजावले- माझ्या भक्तांना त्रास देऊ नकाेस. दुसरीकडे, शापमुक्तीसाठी कामदेवानेही लंबाेदराची उपासना केली. लंबाेदर म्हणाले, ‘मी शाप नष्ट तर करू शकत नाही, पण तुला राहण्यासाठी एक ठिकाण सांगताे. यौवन, नारी, फूल, पक्ष्यांचे मधुर आवाज, माेहात बुडालेली व्यक्ती, बाग-बगीचे, वसंत ऋतू, चंदन, मंद वायू, सुंदर निवासस्थान, नवीन वस्त्रे व आकर्षक दागिन्यांमध्ये तू राहू शकताेस.’
शिकवण : भ्रम, अज्ञान यापासून दूरच राहावे
मोह म्हणजे भ्रम, अज्ञान. माेहासुराच्या पत्नीचे नाव हाेते मदिरा. माणूस भ्रमात असतानाच मदिरेच्या आहारी जाताे. त्याला वाटते की मदिरा प्यायल्याने आनंद वाढताे, हाच भ्रम आहे. या अवताराच्या कथेत कामदेवाला राहण्यास जे स्थान सांगण्यात आले आहेत आपण ती ठिकाणे व वस्तूंपासून दूरच राहायला हवे. जर या गाेष्टींपासून जर दूर राहू शकलाे नाही तर आपल्या चारित्र्याचे पतन हाेऊ शकते.
संकल्प : यंदा गुरुज्ञानाद्वारे करावा माेहाचा अंत
मोहापासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरूची कृपा आवश्यक असते. आयुष्यात एखादाही गुरू मानता आला नाही तर तुम्ही गणेशाला आपला गुरू मानू शकता. त्याचे ज्ञान निर्दाेष आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानाचा सदुपयाेग करण्याची जी विवेकी वृत्ती गणरायाकडे आहे ती इतर देवतांकडे मिळण्याची शक्यता कमीच. गुरू ज्ञानही देतात व आपला विवेकही जागृत करतात. तर यंदाच्या गणेशाेत्सवात संकल्प करा की, जीवनात गुरुमंत्र, गुरूकडून मिळणाऱ्या ज्ञानाद्वारे माेहरूपी राक्षसाचा नायनाट कराल.
संदेश : प्रत्येक कामाच्या वेळी बुद्धीचा उपयाेग करा
हा अवतार शिकवताे की, जीवनात अज्ञानी राहून काेणतेही काम करू नका. कधी-कधी आपला असा भ्रम असताे की, आपल्याला सगळेच माहिती आहे. आपणच सर्वयाेग्य आहाेत, असाही भ्रम अनेकांना असताे. लंबाेदराचा अवतार हे भ्रम दूर करताे. ‘अंतरात्म्याचे ज्ञान हे सर्वात महत्त्वाचे व माेठे असते. मी तुम्हाला जी बुद्धी व विवेक दिला आहे त्याचा वापर करून तुम्ही माेहापासून दूर राहा. तसेच प्रत्येक याेग्य कामाला याेग्य वेळी पूर्ण करा,’ असा संदेशही लंबाेदर देतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.