आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक महिमा:सह्याद्री डोंगरातील गुहेत विराजमान झालेले गिरिजात्मज गणेश

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा गणपती म्हणजे माता पार्वतीच्या तपश्चर्येचे फळ मानला जातो

लेण्याद्रीचा गिरिजात्मज
अष्टविनायकांतील सहावा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेला लेण्याद्री (गिरिजात्मज) गणेश. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री हे गाव वसलेले आहे. हा गणपती म्हणजे माता पार्वतीच्या तपश्चर्येचे फळ मानला जातो.

मूर्तीची वैशिष्ट्ये : दगडातील मूर्ती : लेण्याद्रीच्या दर्शनासाठी गुहेत येताना ३०७ पायऱ्या पार कराव्या लागतात. लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत. यापैकी ८ व्या गुहेत लेण्याद्री गणेश विराजमान आहेत. देवस्थानातील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाशयोजना नसतानाही ही गुहा सतत प्रकाशमान असते अशी हिची रचना आहे. गुहेत कुठेही खांब नाहीत. एका अखंड दगडात ही गुहा कोरलेली असून यातील एका दगडावर श्रींची मूर्ती कोरलेली आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश राहतो. परिसरात पाण्याच्या चार टाक्याही आहेत.

आख्यायिका : पार्वतीची तपश्चर्या
या लेण्यांमध्ये माता पार्वतीने १२ वर्षे तपोसाधना केली होती. त्यानंतर श्रींनी बटुरूपात मातेला दर्शन दिले. यानंतर या गणपतीला पार्वतीचा (गिरी) पुत्र (आत्मज) म्हणून गिरिजात्मज असे नाव पडले. अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रगट झाला. लेण्यांमधला गणपती म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. पुण्यातील जुन्नर येथे बुद्ध लेण्या असून यातील एका लेणीत गिरिजात्मजाची मूर्ती आहे.

असे पोहोचा लेण्याद्रीला :
- मुंबईवरून कल्याण-माळशेज घाट मार्गे गेल्यास १८० किलोमीटरवर लेण्याद्री मंदिराला जाता येते.
- पुण्यातून नारायणगाव-जुन्नरमार्गे प्रवास केल्यावर साधारण १४० किलोमीटर अंतरावर गिरिजात्मज गणेशाचे दर्शन करता येते.