आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंतीची पांडवांना शिकवण:जे आपल्याला मदत करतात त्यांना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असावे

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतातील एक प्रसंग आहे. वनवास काळात कुंती युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्व जंगलात वास्तव्य करत होते. आपल्या वनवास काळात ते एका गावात पोहोचले. तेथे एक राक्षस रोज येऊन गावातील लोकांना खात असे. कुंती आणि पांडव गावात पोहोचले तेव्हा एक ब्राह्मण कुटुंब राक्षसाचा आहार होणार होते.

गावातील लोक कुंती आणि पाच पांडवांना ओळखत नव्हते. कुंतीला ही गोष्ट समजल्यानंतर, त्या ब्राह्मणाला म्हणाल्या तुमचे एक छोटे कुटुंब आहे. आज तुम्ही कुटुंबासह राक्षसाकडे जाऊ नका. आज माझा एक मुलगा त्या राक्षसाकडे जाईल.

ब्राह्मण म्हणाला हे योग्य नाही. माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी इतर कोणाचाही बळी देऊ शकत नाही. कुंतीने त्या व्यक्तीला समजावले की, माझ्या पाच मुलांपैकी एक असा आहे जो त्या राक्षसाचा वध करू शकेल. काळजी करू नका. आज या गावाला त्या राक्षसापासून मुक्ती मिळणार आहे.

कुंतीने भीमाला सांगितले की, आज तू त्या राक्षसाकडे जा आणि त्याचा अंत कर. हे ऐकून युधिष्ठिराने कुंतीला सांगितले की हे योग्य नाही. तुम्ही तुमच्या मुलाला मृत्यूच्या दारात पाठवत आहात.

कुंतीने पाच पांडवांना समजावले की, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला माहीत आहे की भीम खूप बलवान आहे आणि तो या राक्षसाचा नक्की वध करेल. भीमामुळे या गावातील लोकांना राक्षसापासून मुक्ती मिळेल. गावातील लोकांनी आपल्याला मदत केली असून त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यानंतर भीमाने राक्षसाकडे जाऊन त्याचा वध केला.

शिकवण
या प्रसंगातून कुंतीने हा संदेश दिला आहे की, जेव्हा कोणी आपल्याला मदत करतो तेव्हा आपण त्याचे उपकार लक्षात ठेवले पाहिजेत. तो संकटात असेल तेव्हा आपण त्याला मदत केली पाहिजे.