आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वारकऱ्यांविना पंढरी शांत:आषाढीपासूनच कोरोनाचं संकट नष्ट व्हायला सुरुवात होऊ दे हेच विठुरायाकडे साकडं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक रूक्मिणीची महापूजा, बडे दाम्पत्याला महापूजेचा मान

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थिती होणार हा सोहळा यावर्षी कोरोना संकटामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थिती पार पडला. यंदाचा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरात पाहारा देणाऱ्या पाथर्डी येथील विणेकरी विठ्ठल नामदेव बडे यांना मिळाला. या महापूजेला यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थिती होते.

"मी येथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगाच्या वतीने विठुरायाच्या चरणी साकडं घालायला आलो आहे आणि साकडं घातलं आहे. आजपर्यंत आपण अनेकवेळा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडं घातलं."

आषाढी एकादशी निमित विठ्ठल-रूक्मिणीचे मंदिर पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सजवण्यात आले होते.

कोरोनामुळे यंदा आषाढीवारीचा पायी सोहळा रद्द झाला. मात्र आषाढी एकादशीची संत-विठ्ठलभेटीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी मोजक्या मानकऱ्यांसह वैष्णवांचा छोटा गट फुलांनी सजवलेल्या एसटी बसने देहू व अाळंदीतून मंगळवारी पंढरीकडे  दुपारी १ वाजता श्री तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन देहूतून व दुपारी १.३० वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन सायंकाळी पंढरपूरमध्ये पोहोचला.

पोलिसांचा कडक बंदोबस्त 

दरवर्षी विविध संतांच्या पालख्या येथे दाखल झाल्यानंतर वैष्णवांच्या गर्दीमुळे परिसर फुलत असतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सर्व सदस्य तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींनी सर्व पालख्यांचे स्वागत केले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागेचे वाळवंट, प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची कुठेही गर्दी नाही. निर्विघ्नपणे सोहळा पार पडावा यासाठी शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

बातम्या आणखी आहेत...