आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेचे सूत्र:जीवन प्रवास आहे, ध्येय नाही आपणच त्यात आनंद भरावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमी आपली कर्मे, आपल्या कष्टाच्या परिणामावर लक्ष ठेवतो. परिणाम चांगला असेल तर आपल्याला आनंद, शांतता मिळते, पण परिणाम वाईट असेल तर आनंद, शांतता लोप पावते. खरे तर आपल्याला खरी शांतता आणि आनंद परिणामात नाही, तर प्रक्रियेत मिळेल. आपले ध्येयच आनंद आहे, हा विचार आपल्याला बदलावा लागेल. आपण एखाद्या प्रवासाला, सहलीवर जात असू, तर पर्यटनाइतकाच तो रस्ताही आनंददायी असावा. जीवन केवळ प्रवास आहे, प्रक्रियाच सर्व काही आहे, हे एकदा समजले मग आपल्याला शांतता अनुभवायला मिळेल. आपण प्रक्रियेत शांतता शोधली तर ती कधीही दूर जाणार नाही. पण, या स्थितीत पोहोचणार कसे? त्यासाठी आपण हे समजून घ्यावे की, जीवन आपल्याला आनंद व शांतता देत नाही, तर आपणच ते जीवनात आणतो. आपले कर्म आपल्याला आनंद, शांतता देणार नाहीत, मात्र कर्म शांतता आणि आनंदाच्या साथीने करा. तेव्हाच शांतता, आनंद जीवनात स्थायी रूपात राहतील.

तक्रारीने शांतता लाभत नाही
जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला कधीही शांतता अनुभवता येणार नाही. तक्रार करणारा ना झोपू शकतो, ना आनंदी राहू शकतो. पण, त्याने कुठल्याही पद्धतीने जीवनात खूप काही चांगले सुरू आहे, असे पाहण्याची सुंदर सवय स्वतःला लावली, त्याबद्दल आभारी राहिला तर त्याला शांतता मिळेल. स्वाभाविकपणे जीवनाबाबत काही तक्रारी असू शकतात, पण फक्त तक्रारीवर लक्ष देण्याने आपली शांतता हिरावून घेतली जाते.

- आध्यात्मिक गुरू महात्रया रा
infinitheism.com वरून साभार

बातम्या आणखी आहेत...