आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सवाचा पाचवा दिवस:गजाननाचा संदेश- लोभासुराला संपवण्याचे दोन मार्ग; दान आणि वैराग्य

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुबेराच्या भयातून जन्मला होता लोभासुर दैत्य

श्री गणेशाची उपयोगिता भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रांत आहे. जे भौतिक क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांना समृद्धी, भाग्य, प्रतिष्ठा व सफलतेचा आशीर्वाद दिला, तर ज्यांना आध्यात्मिक प्रगती हवी आहे त्यांना गणेशाने सत्याचे मर्म सांगितले आहे. पण, झटपट व्यावसायिक सफलतेच्या लोभामुळे भक्तीचा दुरुपयोगही झाला. लोभ हा व्यावसायिक सफलतेच्या इच्छेला अनियंत्रित करतो. त्याला नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. श्री गणेश आरंभाला शुभ बनवणे व मग कामातील अडचणी दूर करणे, अशी दोन कामे एकावेळी करतात.

कथा : कुबेराच्या भयातून जन्मला होता लोभासुर दैत्य
शिव व सतीच्या दर्शनासाठी गेलेल्या देवतांचे खजीनदार कुबेराने सतीकडे वाईट नजरेने बघितल्यानेे सती क्रोधित झाली. मग घाबरलेल्या कुबेरापासून लोभासुर उत्पन्न झाला. लोभासुराने शिवाची तपस्या करून स्वर्गावर कब्जा मिळवला व तो पाप करू लागला. त्यामुळे मानव आणि ऋषी-मुनींनी श्री गणेशाची आराधन केली. गणेशाने गजाननाचा अवतार घेतला. युद्धाच्या आधीच गुरू शुक्राचार्यांनी लोभासुराला गणेशाचे महात्म्य सांगितले. त्यातून गजाननाच्या शक्तीचा त्याला अंदाज आला व तो गणेशाला शरण गेला.

संदेश : लोभ मनुष्याला अपराधी बनवतो
या अवतारात गणेशाने राजा वरेण्यला उपदेश केला होता. याला गणेश गीता म्हटले जाते. गणेश पुराणाच्या ११ व्या अध्यायात हा उपदेश आहे. याला श्रीकृष्णाच्या गीतेसारखेच मानले जाते. जीवनात लोभ जर सातत्याने राहिला व अनियंत्रित झाला तर तुम्ही अपराधी होण्याची शक्यता खूप असते, हाच संदेश यातून गणेशाने दिला आहे.

संकल्प : वैराग्य व दान या मार्गाने चालावे
या गणेशोत्सवात गजानन अवताराची आराधना करून संकल्प करावा की, आपण आपल्या लोभावर दोन माध्यमातून नियंत्रण मिळवणार आहोत. पहिले वैराग्य व दुसरे दान. वैराग्यातून संतुष्टी मिळते. जे मिळाले ते दान केल्याने आनंद मिळतो. जीवनात आध्यात्मिक उन्नती व स्वच्छ व्यावसायिक सफलतेसाठी दोन्हींची गरज आहे.

शिकवण : लोभ पाप करायला लावतो, पण त्यापासून दूर राहावे
कथेत पाच प्रमुख पात्र आहेत- शिव, सती, कुबेर, लोभासुर व शुक्राचार्य. कुबेर धनाचा अधिपती आहे. ज्याच्या मनात धनाबाबत अती लालसा आहे तो लोभी असणारच. म्हणून सतीच्या भयाने लोभाच्या रूपात लोभासुर उत्पन्न झाला. चांगली बाब ही की गुरू शुक्राचार्यांनी योग्य वेळी लोभासुराला समजावले. आपल्यातही लोभासुर नेहमी सक्रिय असतो. तो आपल्या हातून अनेक वाईट कामेही करून घेतो. योग्य वेळी गुरू आणि गणेशाच्या सानिध्यात राहून यापासून आपण वाचू शकतो.