आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जीवनमार्ग:कृष्णाचा संदेश : मनाचा आनंद भंग न होऊ देता काम करत राहा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संकटात संधी शोधण्याचे आणि संधीत आनंद निर्माण करण्याचे उदाहरण म्हणजे कृष्ण. कृष्ण अद्वितीय, अद्भुत आहे. अद्भुत यासाठी की, त्याने जे केले ते मनापासून केले. अडचणी असो की अडथळे, आनंद भंग होऊ दिला नाही. अद्वितीय यासाठी, की ते मानवी जीवन व्यवस्थित जगले. कृष्ण जन्माच्या वेळी कंसाने जशी परिस्थिती निर्माण केली होती, तशीच आज कोरोनाने उभी केली आहे. आजच्या काळात मानवाच्या व्यावसायिक, सामाजिक-राष्ट्रीय, कौटुंबिक आणि खासगी अशा चारही जीवनांसाठी कृष्णलीलेत गहिरा संदेश दडलेला आहे. तो आज आपल्याला ओळखायचा आहे.

यंदा आपल्याला जन्माष्टमी फक्त साजरीच करायची नाही, तर जगायचीही आहे. तसे केल्यास हा कठीण काळ खूप सोपा वाटेल. आपल्या मनाची प्रसन्नता भंग होऊ न देता काम करा, हा श्रीकृष्णांचा संदेश लक्षात ठेवावा.

व्यावसायिक जीवन
कृष्णाचे चिंतन
: कष्ट म्हणजे योग्यता आणि परिणाम म्हणजे क्षमता असे श्रीकृष्ण मानत होते. त्यांनी गीतेत निष्काम शब्द वापरून सांगितले की, व्यावसायिक जीवनात कर्मफळाबाबत जागरूक राहा, पण आसक्ती ठेवू नका. तसे केल्यास यशामुळे अहंकार, अपयशामुळे नैराश्य येईल.

महामारी : कोरोनाने आपले जीवन बदलले आहे. संकटातही सर्वोत्तम करता येते हे कृष्णाने शिकवले. दुर्योधनाने पांडवांना खांडव वन दिले होते. कृष्णाने या आपत्तीचे रूपांतर संधीत केले आणि तेथेच इंद्रप्रस्थ उभारले. इंद्रप्रस्थाची उभारणी व्यावसायिक दृष्टिकोनाचे आदर्श उदाहरण आहे.

कौटुंबिक जीवन
कृष्णाचे चिंतन :
प्रेम म्हणजे कुटुंबाचा आधार, असे कृष्ण मानत. त्यांच्या एवढे विशाल कुटुंब जगात कोणाचेही नसावे. तरीही त्यांच्याकडे गेल्यावर प्रेमाची भरपूर अनुभूती मिळते, असे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण मानायचा.

महामारी : कोरोनापासून वाचण्यासाठी अंतर बाळगा, असे म्हटले जाते. कृष्ण हस्तिनापुरात राहायचे तेव्हा इंद्रप्रस्थवासीय ते आपल्याजवळ तर ते इंद्रप्रस्थात राहायचे तेव्हा द्वारकावासीयांना ते आपल्याजवळ अाहेत, असे वाटायचे. उपस्थित नसूनही उपस्थित राहावे आणि जवळ राहूनही दूर राहावे, हीच जीवनशैली सध्या उपयोगी ठरेल.

सामाजिक जीवन
कृष्णाचे चिंतन
: श्रीकृष्ण म्हणत असत की, सामाजिक व राष्ट्रीय जीवनात पारदर्शकता राखावी. महाभारताच्या सामाजिक आणि राष्ट्रीय व्यवस्थेत कृष्णाने घेतलेले निर्णय आजही आचारसंहिता मानले जातात.

महामारी: सामाजिक जीवन जगताना कृष्ण शिस्तप्रिय राहिले. ते घोड्यांना स्वत: अंघोळ घालत असत. राजसूय यज्ञात उष्ट्या पत्रावळी त्यांनी स्वत: उचलल्या. कुठलेही काम लहान-मोठे नसते, नीयत लहान-मोठी असते, हा त्यांचा संदेश होता.

खासगी जीवन
कृष्णाचे चिंतन
: आपण शरीर, मन, आत्मा यांपासून बनलोय. वरील तीन जीवनशैली शरीर-मनाने संचालित आहेत, पण खासगी जीवन आत्म्यावर आधारित असावे. खासगी रूपात जेवढे पवित्र असू, बाहेरून तेवढेच शांत राहू.

महामारी : कोरानाच्या या काळात खासगी जीवनाच्या पावित्र्याचा सर्वात मोठा परिणाम शरीरावर होईल आणि तो म्हणजे प्रतिकार शक्तीत वाढ. शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे हाच या महामारीवरील उपचार आहे.

पं. विजयशंकर मेहता
Facebook:Pt. Vijayshankar Mehta