आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रग्रहण:आज रात्री दिसणार उपछाया चंद्रग्रहण, या ग्रहणाची धार्मिक मान्यता नाही

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज रात्री (शुक्रवार, 5 मे) पेनुमब्रल चंद्रग्रहण होणार आहे. या ग्रहणाला कोणतीही धार्मिक मान्यता नाही, त्यामुळेच याचे सुतक पाळले जाणार नाही. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंती आहे. पौर्णिमेशी संबंधित विधी दिवसभर करता येतील.

www.timeanddate.com वेबसाइटनुसार, पेनुमब्रल चंद्रग्रहण आज रात्री 8.44 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्रीनंतर 1.01 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे हे ग्रहण 4 तास 18 मिनिटे चालेल.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा सांगतात की, धर्मग्रंथात अशा चंद्रग्रहणाला मांद्य, उपछाया असे म्हटले आहे. या ग्रहणात चंद्रासमोर धुळीसारखा थर दिसतो. चंद्रावर पृथ्वीची थेट सावली पडत नाही, त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्वही नाही.

ग्रहणाशी संबंधित धार्मिक मान्यता- ग्रहणाबाबत वेगवेगळ्या धार्मिक आणि वैज्ञानिक मान्यता आहेत.

धार्मिक मान्यता - प्राचीन काळी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले. मंथन संपल्यावर अमृत बाहेर आले. भगवान श्रीविष्णूंनी देवतांना अमृत देण्यासाठी मोहिनी अवतार घेतला. मोहिनी देवतांना अमृत देत होती, त्यावेळी राहू नावाचा राक्षसही देवतांच्या वेशात तेथे पोहोचला. राहुला देवता मानून मोहिनीने त्याला अमृत प्यायला दिले.

सूर्य आणि चंद्राने देवतांच्या मध्ये बसलेल्या राहूला ओळखले. त्यांनी ही गोष्ट विष्णूजींना सांगितली. विष्णूजींनी लगेच सुदर्शन चक्राने राहूचा शिरच्छेद केला. राहूने अमृत प्यायले होते, त्यामुळे तो मेला नाही, तर त्याचे दोन भाग झाले. डोके राहू म्हणून ओळखले जाते आणि धड केतू म्हणून ओळखले जाते. सूर्य आणि चंद्र यांनी त्याचे रहस्य विष्णूजींना सांगितले होते, म्हणूनच तो दोघांनाही शत्रू मानतो. शत्रुत्वामुळे राहू वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला ग्रासतो. यालाच ग्रहण म्हणतात.

विज्ञानानुसार जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.

हे शुभ कार्य तुम्ही वैशाख पौर्णिमेला करू शकता
5 मे रोजी हनुमानासमोर दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे.

भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखामध्ये केशर मिसळून देवाला अभिषेक करावा. देवाला पिवळे चमकदार वस्त्र अर्पण करावेत. ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. तुळशीची पाने टाकून मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा.

शिवलिंगाजवळ दिवा लावून ऊँ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. पार्वतीला लाल बांगड्या, लाल साडी, कुमकुम इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात.

शुक्रवारी (5 मे) शुक्र ग्रहासाठी दूध दान करावे. शुक्राची पूजा शिवलिंगाच्या रूपात केली जाते. म्हणूनच शिवलिंगावर चांदीच्या भांड्यातून दूध अर्पण करावे.