आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 मे रोजी चंद्रग्रहण:भारतात दिसणार नाही चंद्रग्रहण आणि त्याचे सुतकही राहणार नाही, वैशाख पौर्णिमेला करावे  दान-पुण्य

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 16 मे 2022 रोजी चंद्रग्रहण होणार आहे. या दिवशी वैशाख महिन्यातील पौर्णिमा आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, यामुळे वेधादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही. वैशाख पौर्णिमेशी संबंधित पूजा आणि इतर सामान्य पूजेसाठी कोणताही अडथळा नाही.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार ग्रहण सकाळी 7.58 वाजता सुरू होईल आणि 11.25 वाजता संपेल. हे ग्रहण कॅनडा, न्यूझीलंड, जर्मनीच्या काही भागात दिसणार आहे. 30 एप्रिल रोजी चैत्र अमावस्येला सूर्यग्रहण होते, हे ग्रहणही भारतात दिसले नव्हते.

आचार्य वराहमिहिराच्या बृहतसंहितेत लिहिले आहे की, जेव्हा एकाच महिन्यात दोन ग्रहण होतात तेव्हा लष्करी हालचाली वाढतात आणि देशात सत्तापालट होण्याची शक्यता वाढते.

हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीत होत आहे. ज्या ठिकाणी ग्रहण दिसेल, तेथे धार्मिक मान्यता मान्य असतील. भारतात ग्रहणाचे कोणतेही सुतक नसेल, तसेच भारत देशात राहणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांवर या ग्रहणाचा कोणताही प्रभाव पडणार नाही.

वैशाख पौर्णिमेला करू शकतात पुण्य कर्म

  • भारतात ग्रहण नसल्यामुळे, ग्रहणाशी संबंधित कोणतेही नियम येथे वैध असणार नाहीत. या कारणास्तव, वैशाख पौर्णिमेशी संबंधित सर्व पुण्य कर्मांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही तीर्थक्षेत्रातील मंदिरांना भेट द्या. दानधर्म करा.
  • पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा सांगण्याची परंपरा आहे. यासोबतच भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करावा. ऊँ नमो भगवते वासुदेवायय मंत्राचा जप करावा.
  • सोमवारी पौर्णिमा असल्याने या दिवशी शिवलिंगाला जल, दूध आणि पुन्हा जल अर्पण करून अभिषेक करावा. ओम ऊँ नम: शिवाय या मंत्राचा जप करत पूजा करावी.
बातम्या आणखी आहेत...