आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या महिन्यातील पहिला सण:अक्षय पुण्य देणारी माघ पौर्णिमा, भगवान श्रीविष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 फेब्रुवारी, रविवारी माघ महिन्यातील पौर्णिमा आहे. ही तिथी पुराणात सण मानली जाते. या पौर्णिमेला गंगेत स्नान करण्याचे विधान आहे. हे शक्य नसल्यास घरातील स्नानाच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकून स्नान केल्याने पुण्य मिळते. या दिवशी गरजू लोकांना दान करून भगवान श्रीविष्णूची पूजा केल्याने सौभाग्य, सुख आणि समृद्धी वाढते. या सणात केलेल्या शुभकर्मांमुळे अक्षय पुण्य मिळते असे पुराण सांगतात.

मान्यता : माघ महिन्यात देवता पृथ्वीवर मानवरूप धारण करून प्रयागमध्ये स्नान-दान आणि जप करतात. यामुळेच या दिवशी प्रयाग येथे गंगेत स्नान केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो.

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, माघ पौर्णिमेला स्नान-दान, हवन, व्रत आणि जप केले जातात. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर स्नानाच्या पाण्यात गंगा-यमुना सारख्या पवित्र नद्यांचे पाणी मिसळून घरीच स्नान करावे.

स्नान केल्यानंतर ऊँ सूर्याय नम:, ऊँ आदित्यय नम: या मंत्राचा उच्चार करत सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. या दिवशी पूजा आणि व्रतासह पितरांचे श्राद्ध करावे. या व्रतामध्ये विशेषत: तिळाचे दान केले जाते.

पुराण काय सांगतात
ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की, या सणाच्या दिवशी भगवान विष्णू पाण्यात वास करतात. म्हणूनच या दिवशी तीर्थक्षेत्र किंवा कोणत्याही नदीत स्नान केल्याने पुण्य मिळते. या दिवशी भगवान श्रीविष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व दोष दूर होऊन निरोगी आयुष्य प्राप्त होते.

पद्म पुराणानुसार, माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगा नदीत स्नान किंवा तीर्थस्थळावर स्नान केल्याने संपूर्ण माघ महिन्यात तीर्थक्षेत्रात स्नान केल्यासारखेच फळ मिळते. मत्स्य पुराणात असे म्हटले आहे की, या दिवशी ब्रह्मवैवर्त पुराणाचे दान केल्याने ब्रह्मलोक प्राप्त होतो. अशा प्रकारे पुण्य देणारा हा सण आहे.

बातम्या आणखी आहेत...