आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाभारताची शिकवण:अतिथींचा सन्मान तर आवश्यक आहेच परंतु घरी आलेल्या शत्रूचाही अपमान करू नये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरी आलेल्या व्यक्तीचा अपमान केल्यास तो आपल्या घरातून सर्व पुण्य घेऊन जातो

सनातन परंपरा सांगते की, अतिथि देवो भवः म्हणजेच अतिथी देवता आहेत. आपल्या दारासमोर आलेला भिकारीसुद्धा अतिथी आहे. धर्म सांगतो, अतिथीचा सत्कार आणि सन्मान आवश्यक आहे. घरी आलेल्या अतिथीचा सन्मान न केल्यास पुण्याचा नाश होतो. आचार्य विष्णू शर्मा यांनी पंचतंत्रमध्ये अतिथी सत्काराविषयी बरेच काही लिहिले आहे. वेदांपासून महाभारतापर्यंत गृहस्थांसाठी जे नियम सांगण्यात आले आहेत, त्यामध्ये अतिथी, संत आणि भिक्षुक या तिघांच्याही सन्मानाची आवश्यकता अनिवार्य सांगण्यात आली आहे.

महाभारताच्या शांतिपर्वमध्ये सांगण्यात आले आहे की....

अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात् प्रतिनिवर्तते। 

स दत्त्वा दुष्कृतम् तस्मै पुण्यमादाय गच्छति।। (महाभारत) 

अर्थ - ज्या गृहस्थाच्या घरातून अतिथी विना सन्मान, भिक्षुक विना भिक्षा निराश होऊन परत जातो, तो त्या गृहस्थाला आपले पाप देऊन त्याचे सर्व पुण्य घेऊन जातो.

आचार्य चाणक्यांनीही सांगितले आहे की, तुमच्या घरी शत्रूही आला तरी त्याचा योग्य सन्मान करावा. घरी आलेल्या व्यक्तीचा अपमान केल्यास तो त्याचे सर्व पाप तुमच्या घरात सोडून तुमचे सर्व पुण्य घेऊन जातो. भगवतगीतामध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, समस्त चराचरमध्ये त्यांचाच अंश आहे. याचा अर्थ तुमच्यासमोर जो कोणी येत आहे, तुमच्या घरात जो येत आहे तो परमात्म्याचा अंश आहे. यामुळे आपल्या ग्रंथांमध्ये अतिथीला देवता मानण्यात आले आहे. अतिथीचा सन्मान आवश्यक सांगण्यात आला आहे. हीच आपली सनातन परंपरा आहे.