आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक महिमा:सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळणारा रांजणगावचा महागणपती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची श्रद्धा; मूळ मूर्तीला म्हटले जाते ‘महोत्कट’

रांजणगावचा महागणपती
अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती. पुणे जिल्ह्यात हे ठिकाण येते. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या अष्टविनायकाला ओळखले जाते. मूळ मूर्तीला ‘महोत्कट’ म्हटले जाते. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण केले आहे. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आख्यायिका : त्रिपुरासुराचा वध
श्री गजाननाची आराधना करत त्रिपुरासुराने त्यांना एक वरदान मागितले. भगवान शंकराशिवाय माझा कुणीही वध करू शकणार नाही, कोणताही देव मला हरवू शकणार नाही, असे त्याला वरदान प्राप्त झालेे. यानंतर त्रिपुरासुर उन्मत्त झाला. देवांचा पराभव करून त्याने कैलासाकडे कूच केले. भगवान शंकर आणि त्याच्यात तुंबळ युद्ध झाले. यात गजाननाचे स्मरण करत शंकराने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. याच दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.

मूर्तीची वैशिष्ट्ये : दोन मूर्ती
मंदिरातील गाभाऱ्यात शेंदूर लावलेली महागणपतीची मोठी मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. दक्षिणायन व उत्तरायण यांच्या मध्यकाळात सूर्याची किरणे गाभाऱ्यातील गजाननावर पडतील अशी मंदिराची रचना असल्याने या कालावधीत मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. मूर्तीच्या खालच्या बाजूस तळघर असून त्यात महागणपतीची आणखी एक मूर्ती आहे. या मूर्तीला दहा सोंड व वीस हात आहेत. मंदिराचा गाभारा हा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. पेशव्यांची या गणपतीवर श्रद्धा होत

असे पोहोचाल रांजणगावला
- पुणे आणि अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने तसेच बसेस रांजणगावला जातात.
- पुणे-अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे.