आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी देवीच्या मोठ्या बहिणीची कहाणी:उद्दालक मुनींशी झाला होता अलक्ष्मीचा विवाह, जाणून घ्या कोणत्या घरात राहते अलक्ष्मी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 4 नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे आणि या दिवशी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की, ज्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यांच्या घरात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही. देवी लक्ष्मीला एक मोठी बहीण असल्याचे सांगितले जाते, तिचे नाव अलक्ष्मी आहे. अलक्ष्मी म्हणजे गरिबी, दरिद्रता.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी महालक्ष्मीपूर्वी त्यांची मोठी बहीण अलक्ष्मी प्रथम बाहेर आली. परंतु 14 रत्नांमध्ये अलक्ष्मीची गणना होत नाही. कारण अलक्ष्मीला असुरांनी स्वीकारले.

देवी अलक्ष्मी ही गरिबी आणि दारिद्रतेची देवी आहे. असे मानले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी 14 मूळ रत्ने बाहेर आली आणि यासोबतच काही उपरत्ने देखील बाहेर आली. या उपरत्नांपैकी एक अलक्ष्मी देखील होती. वारुणी देवीच अलक्ष्मी होती असे काही लोक मानतात. भगवान विष्णूंच्या आज्ञेने राक्षसांना वारुणी म्हणजेच दारू देण्यात आली. अलक्ष्मीची उत्पत्तीही सागरातून झाली होती, म्हणूनच तिला लक्ष्मी देवीची मोठी बहीण म्हणतात.

पं.शर्मा यांच्यानुसार, अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी झाला होता. जेव्हा ऋषी अलक्ष्मीला घेऊन त्यांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अलक्ष्मीने त्या आश्रमात जाण्यास नकार दिला होता. ऋषींनी न येण्याचे कारण विचारले असता अलक्ष्मी म्हणाली, 'मी फक्त त्या ठिकाणी जाते जिथे घाण असते, जिथे लोक सतत भांडतात, अस्वच्छ कपडे घालतात आणि अधर्मात राहतात. अशा ठिकाणी अलक्ष्मी वास करते.

अलक्ष्मी पुढे म्हणाली, 'ज्या घरांमध्ये नेहमी स्वच्छता असते, जिथे लोक सकाळी लवकर उठतात, रोज देवाची पूजा करतात, स्वच्छ कपडे घालतात, मी म्हणजेच अलक्ष्मी अशा ठिकाणी जात नाही. अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो.

बातम्या आणखी आहेत...